मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केल्यानंतर भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी आता राज्य सरकारला घेरले आहे. ठाकरे सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही. माझं चॅलेंज आहे. असा थेट दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
कोरोनात काळात ठाकरे सरकारने जनतेला आवळा दिला. सगळा निधी केंद्राने दिला होता. यांनी एक मास्क देखील विकत घेतला नाही. केवळ चेक हातात घेऊन फिरत होते. असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. त्याचबरोबर इंधनाबाबत ठाकरे सरकार सकारात्मक निर्णय घेणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. आम्ही कपटी नाही, पण माझं चॅलेंज आहे हे सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही. असं चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
पेट्रोल आणि डिझेलचे दर आता राज्याने कमी केले पाहिजेत.१४ राज्यांनी देखील दर कमी केले आहेत. यामध्ये १० राज्य ही भाजपाशासित आहेत. शेजारील कर्नाटकाने तर डिझेलचे भाव १९ रुपयांनी घाटावले आहेत. २०२४ ला काय करायचे ते जनता ठरवेल. शंभूराज देसाई यांनी त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीचे बघावे, असंही त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा:
उत्तरप्रदेश, हरियाणानंतर मध्यप्रदेशात येणार ‘हा’ कायदा
चिमुरडीने का लिहिले सरन्यायाधीशांना पत्र?
यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत यांनी काय म्हणायचं हा त्यांचा प्रश्न आहे. भाजपाने पोटनिवडणुकीत एकूण जास्त जागा जिंकल्या. राऊत हे दुर्बीण घेऊन बसले आहेत. कुठं छिद्र आहे हे बरोबर शोधतात. संपूर्ण पोशाख ते बघत नाहीत, असा चिमटा त्यांनी काढला. कलाबेन डेलकर यांचा विजय हा शिवसेनेचा विजय म्हणायचा का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.