राज्यात ऑक्सिजनची कमतरता, डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची कमी या सर्व अडचणींमुळे आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असताना भाजपाचे नेते निलेश राणे यांनी या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला घेरले आहे. निलेश राणे यांनी ट्विट करून ठाकरे सरकारच्या कोरोना नियोजनावर टीका केली आहे.
ठाकरे सरकारचे दीड वर्ष फक्त अर्णब गोस्वामी, कंगना राणावत यांच्या सोबत २ हात करण्यात गेले. राज्यात ऑक्सिजन प्लँटसची कमतरता आहे, लस व इंजेक्शन कमी, डॉक्टर्स कमी आहेत, आरोग्य कर्मचारी वर्गाचे पगार रखडलेत…
१२,५०,००० × १५ सूनवाई = १,८७,५०,००० पैशाचा चुराडा. pic.twitter.com/egqxuTwRsP
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 11, 2021
याशिवाय सरकारने काँग्रेस नेते आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील अभिषेक मनू सिंघवी यांना पत्रकार अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रानौत यांच्या विरोधात खटला लढवण्यासाठी १२ लाख पन्नास हजार रुपये प्रति सुनावणी दिल्याची माहिती समोर आली आहे. याही मुद्द्यावरून निलेश राणेंनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे.
“ठाकरे सरकारचे दीड वर्ष फक्त अर्णब गोस्वामी, कंगना राणावत यांच्या सोबत दोन हात करण्यात गेले. राज्यात ऑक्सिजन प्लँटसची कमतरता आहे, लस व इंजेक्शन कमी, डॉक्टर्स कमी आहेत, आरोग्य कर्मचारी वर्गाचे पगार रखडलेत… १२,५०,००० × १५ सूनवाई = १,८७,५०,००० पैशाचा चुराडा.” असावं ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.
हे ही वाचा:
अहमदनगरमधील लॉकडाऊन ५ दिवसांनी वाढवला
माजी खासदार पप्पू यादव यांना अटक
मुंबईतील रुग्ण पुण्यात पाठवणे हेच मुंबई मॉडेल?
अनिल देशमुख प्रकरण आता ‘ईडी’कडे
ठाकरे सरकारने दीड वर्ष केवळ अर्णब आणि कंगना विरोधात खटले लढवण्यात वेळ आणि पैसे वाया घालवला आणि वैद्यकीय सोई सुविधांकडे दुर्लक्ष केले, असा आरोप निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर लगावला आहे.