आधी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्या, मग बंद पाळा!

आधी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्या, मग बंद पाळा!

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी ठाकरे सरकारवर बंदच्या निमित्ताने हल्लाबोल केला. “शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाराष्ट्र बंदची हाक देऊन राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.” असं ते म्हणाले.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी जिल्ह्यात चार शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात आला. “आम्ही त्याचा निषेध करतो कारण यामुळे सामान्य जनतेला त्रास झाला आहे. बंद पाळण्याऐवजी ठाकरे सरकारने आधी मराठवाडा आणि विदर्भात नुकत्याच आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे.” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्य सरकारने त्यांच्यासाठी आश्वासनांशिवाय काहीच केले नाही, असा आरोपही त्यांनी केला.

राज्यातील सत्ताधारी महा विकास आघाडीच्या (एमव्हीए) तीन पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान बहुतांश दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने बंद पाडण्यात आली. मुंबई आणि आसपासच्या भागात बससेवा प्रभावित झाली. बेस्टच्या बसेस आणि अनेक पारंपारिक काळ्या आणि पिवळ्या टॅक्सी रस्त्यावर नागरिकांना दिसतही नाहीत. बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारी मध्यरात्री ते सकाळी ८ च्या दरम्यान मुंबईतील विविध भागात त्याच्या आठ बसची तोडफोड करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

काश्मीरच्या पुंछमध्ये ५ जवान हुतात्मा

‘बंद आणि विरोध यांचा “धंदा”, गोळा होतो त्यावरच “चंदा”!’

नवाब मलिकविरोधात १०० कोटींचा दावा करणार मोहित कंबोज

चेन्नई सुपर किंग्स पुन्हा एकदा अंतिम फेरीत

लोकल ट्रेन नियमित वेळेनुसार धावत असल्याने रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी दिसून आली. परंतु अनेक प्रवाशांनी उपनगरीय रेल्वे सेवा घेतल्याने गर्दी झाली होती. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी पीटीआयला सांगितले की, “आमच्या सेवा वेळापत्रकानुसार सुरू आहेत. लोकल ट्रेन त्यांच्या नियमित वेळापत्रकानुसार चालत आहेत, त्यामुळे नागरिक त्यांच्या दिवसाचे नियोजन करू शकता. अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे कार्यरत आहेत.” असे मुंबई पोलिसांनी देखील ट्विट केले आहे.

Exit mobile version