ठाकरे सरकारने मार्शल पाठवून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला

ठाकरे सरकारने मार्शल पाठवून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला

लोकशाही प्रक्रियेनुसार विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानभवनाच्या परिसरात अभिरुप विधानसभा भरविली. त्यामध्ये विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आपण कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नाही, तरीही सरकारने हुकुमशाही करीत विधीमंडळाच्या मार्शलमार्फत आमचे माईक, स्पीकर काढून घेतल्याचा दावा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलाय. तसेच विधानभवनाच्या सुरक्षा रक्षक अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देणे ही सरकाराची मनमानी आहे. हा एका प्रकारे लोकशाहीचा खून आहे, या शब्दात प्रविण दरेकर यांनी सरकारचा धिक्कार नोंदवला.

विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सोमवारी (५ जुलै) भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केलं. त्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजप व मित्र पक्षांच्या आमदारांनी थेट विधानभवनाच्या पायऱ्यांजवळील प्रवेशद्वावर अभिरुप विधानसभा आयोजित करत भाजपच्या आमदारांचे निलंबन करण्याच्या निर्णयाचा निषेध नोंदविला.

हा विषय विधानपरिषेदत उपस्थित झाल्यानंतर यासंदर्भात बोलताना दरेकर म्हणाले, “माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर बसून अभिरुपी विधानसभा भरवावी लागते. तरीही या अभिरुपी विधानसभेच्या कामकाजावर सुरक्षा रक्षकांमार्फत कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतात. हे दुर्दैवी आहे. फक्त विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार आहे.”

हे ही वाचा:

दलाई लामांचा ८६ वा वाढदिवस यामुळे झाला खास

ट्विटरला आता उच्च न्यायालयानेही झापले

थकबाकी भरा मगच परवाने मिळतील

‘शिवीगाळ’-‘निलंबन’ ‘नाट्या’नंतर भास्कर जाधवांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

“भाजपाच्या १२ सदस्यांच्या निलंबन प्रकरणाच्या चौकशीमध्ये सत्य नक्कीच बाहेर येईल. माइक आणि स्पीकर काढून घेऊन विरोधकांचा आवाज दाबता येणार नाही. विरोधी पक्षांचे सदस्य विधानसभा कामकाजात सहभागी होत नसतील तर कामकाज स्थगित करता येते. विधिमंडळाच्या कामकाजामध्ये विरोधी पक्ष उपस्थित नसेल तर त्या कामकाजाला महत्व नसते. कारण लोकशाहीमध्ये, संविधानामध्ये विरोधी पक्षालाही तितकेच महत्व आहे,” अशी टीका दरेकर यांनी केली.

Exit mobile version