ठाकरे सरकारने मराठा आरक्षण विषयाचे फक्त राजकारण केले

ठाकरे सरकारने मराठा आरक्षण विषयाचे फक्त राजकारण केले

मराठा समाजावर घनघोर अन्याय झाल्याची अतुल भातखळकरांची टीका

सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला दणका देत राज्य सरकारने पारित केलेले मराठा आरक्षण रद्दबादल ठरवले आहे. त्यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील ट्वीटरवरून सरकारवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा:

मराठा आरक्षणावर ठाकरे सरकारसमोर आता ‘हा’ एकच पर्याय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेच्या मोठ्या घोषणा

मराठा आरक्षण म्हणजे अल्ट्रा व्हायरस- अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते

गरजूंना बाजूला सारून लसींचा ओघ मंत्र्यांच्या जिल्ह्यात

फडणवीसांच्या काळापासून मराठा आरक्षणाची प्रक्रिया चालू होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायलयाने निकाल दिला. मात्र या निकालात न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी संपूर्णपणे फेटाळून लावली आहे. त्यांनी ठाकरे सरकारने या विषयाचे पोतेरे केले असल्याची कठोर टीका केली. याबबत आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की,

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. महावसुली आघाडी सरकारने सत्ता हातात घेतल्या दिवसापासून मराठा आरक्षणच्या विषयाचे पोतेरे केले. कोर्टात ठामपणे बाजू मांडली नाही.फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी केलेली यशस्वी व्यूहरचना पूर्णपणे कोलमडून टाकली.धिक्कार असो या नाकर्त्यांचा.

त्याबरोबरच लगोलग दुसरे एक ट्वीट देखील त्यांनी केले. या ट्वीटमध्ये त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचे केवळ राजकारण केले गेले असल्याची बोचरी टीका केली आहे. यामुळे मराठा समाजावर घनघोर अन्याय झाला असल्याचे ते म्हणाले आहेत.

ठाकरे सरकारमध्ये बसलेल्या मराठा नेत्यांना मराठा समाजाला न्याय दिला नाही. त्यांना मराठा आरक्षणाच्या विषयाचे फक्त राजकारण करायचे आहे. त्यामुळेच हा विषय कोर्टात टिकला नाही. मराठा समाजावर घनघोर अन्याय झाला.

Exit mobile version