ऑक्सिजनच्या निर्यातीवर बंदी घालणे ठाकरे सरकारला सुचले नाही
महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलेले असताना रुग्णांना विविध सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर यांसारख्या औषधांचा समावेश आहे. त्यात सर्वात जास्त तुटवडा सध्या ऑक्सिजनचा जाणवत आहे. मात्र कोणत्याही बाबतीत केवळ केंद्राकडे बोट दाखवणे हे एकमेव धोरण ठाकरे सरकार राबवत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. परंतु आता तर ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेचा कहर झाला आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारची रेमडेसिवीरच्या किंमतीसाठी घासाघीस
मुख्यमंत्र्यांनी ‘माझे राज्य, माझी जबाबदारी’ म्हणत कर्तव्यपूर्ती करावी
कोरोना लसीवर असलेली बौद्धिक संपदेची कलमे शिथिल करा
बंगालमध्ये हिंसाचाराच्या तुरळक घटना
महाराष्ट्रात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे. महाराष्ट्राच्या शेजारचे राज्य गोव्याने ऑक्सिजनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. परंतु अजून ती बुद्धी ठाकरे सरकारला झालेली दिसत नाही. त्यावरून भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.
आपले सख्खे शेजारी असलेल्या गोवा राज्याने ऑक्सिजनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. देशातील ऑक्सिजन निर्मिती करणारी बडी कम्पनी आयनोक्स पुण्यात आहे. त्यांच्या निर्यातीवर बंदी घालावी हे वसुलीत गुंतलेल्या ठाकरे सरकारला सुचलं नाही. कारण हे निकम्मे आहेत. यांच्याकडे फक्त खंडणीक्षमता आहे.
अशा शब्दात भातखळकरांनी ठाकरे सरकारवर ट्वीटरवरून टीका केली आहे.
आपले सख्खे शेजारी असलेल्या गोवा राज्याने ऑक्सिजनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
देशातील ऑक्सिजन निर्मिती करणारी बडी कम्पनी आयनोक्स पुण्यात आहे. त्यांच्या निर्यातीवर बंदी घालावी हे वसुलीत गुंतलेल्या ठाकरे सरकारला सुचलं नाही. कारण हे निकम्मे आहेत. यांच्याकडे फक्त खंडणीक्षमता आहे.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 17, 2021
ठाकरे सरकार रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत देखील अत्यंत उदासीन असल्याचे दिसून आले होते. राज्यात औषधाचा तुटवडा असताना देखील सरकारला किंमतीत घासाघीस करायची असल्याचे संतापजनक चित्र नुकतेच समोर आले आहे.