राज्यातील ठाकरे सरकार ‘पोलिसजीवी’ असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला केला. तुम्ही बोललात तर ती ठाकरे शैली आणि दुसरे कुणी बोलले तर जीभ घसरली असे कसे चालेल, असे कसे चालेल, अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरे सरकारला जाब विचारला.
नारायण राणेंविरुद्ध पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीविषयी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपा राणेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं त्यांनी सांगितलं.
“महाराष्ट्रात शार्जील उस्मानी येतो, हिंदूंना शिव्या घालतो, हिंदू धर्मावर असभ्य भाषेत बोलतो. पण त्यावर साधी एफआयआर सुद्धा दाखल होत नाही. त्यावेळी ठाकरे सरकार शेपूट घालतं. नारायण राणे जे बोलले ते मुळात गुन्हा दाखल करण्यासारखे नाहीच आहे. पोलीस आयुक्तांनी जाणूनबुजून सरकारला खूष करण्यासाठी हा गुन्हा दाखल केला आहे. ते स्वतःला छत्रपती समजतात का? नारायण राणेंच्या मुसक्या बांधा, त्यांना कोर्टासमोर हजार करा. ही पोलीस आयुक्तांच्या पत्राची भाषा आहे. ठाकरे सरकार पोलिसांचा गैरवापर करत आहे. वारंवार विविध प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयाकडून चपराक मिळूनही ठाकरे सरकारचा पोलिसजीवी कारभार सुरूच आहे. अर्णब गोस्वामींचं प्रकरण असो किंवा कंगना राणावत, वारंवार न्यायालयाने सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत.” असं फडणवीस म्हणाले.
” आम्ही नारायण राणेंच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही. पण सरकारने ज्या बेकायदेशीर पद्धतीने राणेंविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. त्याविरुद्ध आम्ही नारायण राणेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. मी त्या त्या पोलीस आयुक्तांनादेखील सांगू इच्छितो की अशा पद्धतीने जर आमच्या कार्यालयावर हल्ले झाले. पोलिसांच्या संरक्षणात हल्ले झाले तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरू. महाराष्ट्रात बंगालसारखी स्थिती तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्या पद्धतीने सरकारच्या मदतीनेच हिंसाचार बंगालमध्ये सुरु होता त्याच पद्धतीने आज मुंबईतही हिंसाचार सुरु आहे. जर अशा पद्धतीने आमच्या कार्यालयावर हल्ला झाला तर आम्ही दोन्ही विरोधी पक्षनेते पोलीस आईकतांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन जाऊ. हे काही तालिबांचं राज्य आहे का? इथे कायद्याचं राज्य असायला हवं.” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
राणेंच्या अटकेने काय पडसाद उमटतील, याचा विचार केलाय का?
सायकल ट्रॅकचा घाट कुणाच्या फायद्यासाठी?
ते आक्रमक झाले तर आम्ही डबल आक्रमक होऊ
शिवडी बीडीडी चाळीतील रहिवासी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत
“तुम्ही नारायण राणेंवर आरोप करताय पण तुम्ही कोणत्या तोंडाने आरोप करताय? तुम्ही केंद्रीय मंत्र्यांना निर्लज्ज म्हणता, लाथा घालू म्हणता, चौकीदार चोर है म्हणता, त्यावेळी का नाही गुन्हे दाखल होत?आणि माझ्यावरचं तर सोडूनच द्या, ज्या पद्धतीने माझ्यावर माझ्या पत्नीवर आणि माझ्या कुटुंबावर आरोप होतात, हल्ले होतात त्याचा सामना करायला आम्ही खंबीर आहोत. त्याविषयी तर मी बोलतच नाही. पण ही दुटप्पी भूमिका चालणार नाही. तुम्ही बोललं तेंव्हा ती ठाकरे शैली आणि दुसरा कोणी बोलला कि जीभ घसरली ही भूमिका योग्य नाही.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.