25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारण"ठाकरे सरकार हे चायना मेड" - निलेश राणे

“ठाकरे सरकार हे चायना मेड” – निलेश राणे

Google News Follow

Related

भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सरकारचे मनाईचे आदेश झुगारून आज शेकडो भाजपा कार्यकर्त्यांसह सिंधुदुर्ग किल्यावर शिवजयंती साजरी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “ठाकरे सरकार हे चायना मेड असलेले डुप्लिकेट सरकार आहे.” असा टोला निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर लगावला.

“शिवनेरीवर सामान्य शिवभक्तांसाठी १४४ कलम लागू केले आणि मुख्यमंत्री, उपमुख्यामंत्री हेलिकॉप्टरने गेले. शिवभक्तांचा हा अपमान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. शिवरायांच्या पालखीला शिवाजी महाराजांच्या गादिचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांना साधा हातही लावायला दिला नाही. हा छत्रपतींच्या गादीचा अपमान आहे. त्यामुळे अशा लोकांच्या पाठीमागून संभाजी राजे यांनी फरफटत जाऊ नये. उभा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे.” असे निलेश राणे म्हणाले.

हे ही वाचा:

“राजीनामा दिला म्हणजे काही उपकार नाही, आता गुन्हा दाखल करा”- निलेश राणे

“शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ल्यांना द्यायला पैसे नाहीत हे दुर्दैव आहे. या सरकारचे शिवाजी महाराजांवरचे प्रेम डुप्लिकेट आहे. इतकी वर्ष होऊनही शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी हे सरकार पैसे देऊ शकलेले नाही. जाहीर केलेले पैसेही द्यायला सरकारला जमत नाही. कोरोनाचे कारण सांगताहेत. शिवरायांबद्दलचे शिवसेनेचे प्रेम हे केवळ दाखविण्यासाठी आणि लोकांना मूर्ख बनविण्यासाठी आहे. हा त्यांचा निवडणुकीचा अजेंडा आहे. हे महाराष्ट्रातील जनतेला केव्हाच लक्षात आले आहे.” असेही निलेश राणे म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा