26 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरराजकारणठाकरे सरकार हे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे

ठाकरे सरकार हे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे

Google News Follow

Related

राज्यातील महाविकास आघाडीचं हे सरकार चुकून आलेलं आहे. ज्या पद्धतीने गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे आहेत. तसं हे सरकार आहे, असं टीकास्त्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोडलं. पत्रकारांनी कोरोनाकाळात महत्वपूर्ण काम केल्यामुळे त्यांना अनेक राज्यांमध्ये फ्रंटलाईन वर्कर्स घोषित केलं. पण महाराष्ट्रात तसं घडलं नाही. पत्रकारांच्या लसीकरण कार्यक्रमानंतर फडणवीस बोलत होते. भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेवर शिवसेनेनं जत्रा अशी टीका केली होती. मात्र ज्यांना जत्रेचा अनुभव आहे, त्यांना दुसरं काय दिसणार, आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद दिसतोय, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पत्रकारांनी कोरोना काळात महत्वाची भूमिका निभावली आहे. अनेकांनी पत्रकारांना फ्रन्ट लाईन वर्कर म्हणून घोषित केलं आहे. आम्हीही तशी विनंती राज्य सरकारकडे केली होती. इतर राज्यांनी केलं आहे, पण आपल्या राज्यात त्यावर निर्णय झाला नाही, असं फडणवीसांनी सांगितलं.

शेतकऱ्यांना आपली व्यथा मांडायला व्यासपीठ नाही. काही अधिकारी स्पेशल पोस्टिंगने आलेले आहेत. मंत्रालय येथील शेतकऱ्याची आत्महत्या ही दुर्दैवी आहे. किमान मृत्यूनंतर तरी शेतकऱ्यांचं म्हणणे सरकारने ऐकावं, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेले शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुभाष जाधव यांच्या आत्महत्या प्रकरणी मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी विलास शिंदे याच्यासह त्याच्या कुटुंबातील अनेक सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी सुभाष जाधव यांचा मृतदेह शवविच्छेदन करुन ताब्यात घेतला आणि गावी रवाना झाले.

भारतीय दंड संहिताचे कलम ३०६, ३४ आणि महासावकारी अधिनियम ४५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी सुभाष जाधव यांची पत्नी साधना सुभाष जाधव, मुलगा अजय सुभाष जाधव आणि मुलगी प्रतीक्षा जाधव यांनी सरकारकडे हात जोडून केली.

हे ही वाचा:

माझा कोणावरही विश्वास नाही

तालिबानचे हजारो दहशतवादी लवकरच पंजशीरमध्ये जाणार?

पंजशीर विरुद्ध तालिबान

आता चिंता अफगाणिस्तानातून युरोपात होणाऱ्या स्थलांतराची

मोदी सरकारमधील मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. देशासह महाराष्ट्रातल्या विविध भागांत-शहरांत अनेक केंद्रीय मंत्री तथा नवनिर्वाचित मंत्री जाऊन जनतेशी संवाद साधत आहेत. नव्याने मंत्री झालेले भाजपा नेते नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार, रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्त्वात भाजपाची जन आशिर्वाद यात्रा विविध जिल्ह्यात जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा