ठाकरे सरकार म्हणजे, ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’

ठाकरे सरकार म्हणजे, ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’

शिवसेचे राज्यसभा खासदार खासदार संजय राऊत यांनी लिहिलेला अग्रलेख आणि माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रिया यावर भाजपा नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारला, ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ म्हणत ‘जैसी करणी, वैसी भरणी.’ असाही खोचक टोला लगावला आहे.

“महाविकास आघाडीला, आयटी आणि ईडीची एवढी भिती का वाटते आहे? सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून ‘चोराच्या मनांत चांदणं’ दिसतंय. केंद्रीय यंत्रणांनी जनतेला लुटणाऱ्या टोळी विरोधात सर्जिकल स्ट्राईक सुरू केलाय. हे ‘अलीबाबा अन् ४० चोरांचं’ सरकार, चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल.” असं ट्विट करत चित्र वाघ यांनी ठाकरे सरकार आणि संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

“ईडी, सीबीआय, एनसीबी आणि इतर तपास यंत्रणा आमच्याविरोधात वापरता ना. मग ईडी, सीबीआयसह किरीट सोमय्यांनाही जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. त्यांना पाहून अतिरेकी पळून जातील.” असं संजय राऊत म्हणाले होते. त्यालाच उत्तर देताना चित्र वाघ यांनी हे विधान केले आहे.

हे ही वाचा:

हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज ठाकरे जाणार अयोध्येला

सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्ताच्या घरी सापडले एक कोटी

‘संजय राऊत यांचे गांजावर इतके प्रेम बरे नाही!’

सहा गाड्या धडकल्या; तीन मृत्यू

“सर्वज्ञानी संजय राऊतांचा संताप समजू शकते. चुकवलेले लाखों रूपये मागच्या दारानं लपत छपत पुन्हा जमा करावे लागले. याचाच अर्थ केंद्रीय यंत्रणा योग्य मार्गावर आहे. आता आदळआपट करून उपयोग नाही. जैसी करणी, वैसी भरणी.” असंही चित्र वाघ म्हणाल्या.

Exit mobile version