रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्यावरुन राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकारण रंगलं आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची बदली करण्यात आली आहे. या बदलीचं स्वागत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हान यांनी केलंय. तर काळे यांच्या बदली विरोधात भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. काळेंची बदली करुन ठाकरे सरकारनं सूडाचा कळस गाठल्याचा घणाघात भातखळकरांनी केलाय.
रेमदेसीवीरसाठी भाजपला पत्र देणाऱ्या FDA आयुक्त अभिमन्यू काळेंची बदली करून ठाकरे सरकारने सूडाचा कळस गाठला आहे. महाराष्ट्राचे हित गेले चुलीत, टक्केवारी शिवाय काहीच यशस्वी होऊ द्यायच नाहीत असा निश्चय ठाकरे सरकारने केला आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 20, 2021
अभिमन्यू काळे यांच्या बदलीवरुन अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. “रेमडेसीवीरसाठी भाजपाला पत्र देणाऱ्या एफडीए आयुक्त अभिमन्यू काळेंची बदली करून ठाकरे सरकारने सूडाचा कळस गाठला आहे. महाराष्ट्राचे हित गेले चुलीत, टक्केवारी शिवाय काहीच यशस्वी होऊ द्यायच नाहीत असा निश्चय ठाकरे सरकारने केला आहे.” असं ट्वीट भातखळकर यांनी केलं आहे.
हे ही वाचा:
राज्यात आणीबाणी लावा- काँग्रेस आमदाराचेच मोदींना पत्र
श्रीरामनवमी निमित्त पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा
डोंबीवलीचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांचे निधन
महाराष्ट्र अडचणीत असताना स्वत:च्या परीने महाराष्ट्राला मदत केली नाही. उलट संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनाही मी कारवाईबाबत सांगितलं आणि त्यांनी होकार दिला. मुजोर अधिकाऱ्यांना बाजूला करणं योग्यच असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. ही धमकी नाही. इतर अधिकाऱ्यांनी काय समजायचं ते समजा. का कारवाई झाली? कशामुळे झाली? याबाबत मी बोलणार नाही, असंही आव्हाड म्हणाले.