पानिपत होण्याच्या भीतीनेच ठाकरे सरकार निवडणुका पुढे ढकलत आहे

पानिपत होण्याच्या भीतीनेच ठाकरे सरकार निवडणुका पुढे ढकलत आहे

“पानिपत होण्याच्या भीतीनेच हा निर्णय घेण्यात आला आहे हे सूर्यप्रकाशा एवढे स्वच्छ आहे.” असं म्हणत भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

“ठाकरे सरकार मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलणार अशी वदंता आहे. निवडणुका पुढे ढकलण्यासाठी खंडणीखोर ठाकरे सरकारने कोणतेही कारण देवो. पानिपत होण्याच्या भीतीनेच हा निर्णय घेण्यात आला आहे हे सूर्यप्रकाशा एवढे स्वच्छ आहे.” असं ट्विट अतुल भातखळकरांनी केलं आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्माण झालेल्या ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळे ठाकरे सरकारकडून मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना तसे संकेत दिले. निवडणूक आयोगाने कोरोनाचे नियम पाळून निवडणुका घेण्याचे नियोजन केले आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही तोवर निवडणुका घेऊ नये असा दबाव आहे. त्यामुळे आगामी काळातील नियोजित महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. राज्यात पुणे, मुंबई, कोल्हापूरसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रस्तावित आहे. महापालिका निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहेत.

हे ही वाचा:

रोनाल्डोची घरपावसी

अमेरिकेने घेतला १३ जवानांचा बदला

नारायण राणेच्या नादी लागू नका…नाही तर मला सगळेच बोलावे लागेल

अखेर राष्ट्रवादीला दिसले रस्त्यावरील खड्डे

कालच्या बैठकीत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे, या विषयावर सगळ्याच पक्षांचे एकमत झाले होते. राजकीय आरक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत सर्वांनी केलेल्या सूचनांचे स्वागत आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी विविध राजकीय पक्षांची मते आजच्या बैठकीत समजून घेतली. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ नयेत ही सर्वांचीच भावना असल्याचे म्हटले होते.

Exit mobile version