ठाकरे सरकारची अवस्था म्हणजे आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी- अतुल भातखळकर

ठाकरे सरकारची अवस्था म्हणजे आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी- अतुल भातखळकर

महाराष्ट्रात कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. महाराष्ट्र कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर उभा आहे, असा गंभीर इशारा केंद्राच्या आरोग्य पथकाने दिला आहे. परंतु ठाकरे सरकारने, केंद्राने दिलेल्या लसींपैकी केवळ ४४ टक्के लसीच वापरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

“राज्य सरकारची अनास्था, त्यांनी पाठवलेल्या पात्रातून दिसत्येय. ऍक्टिव्ह केसेसचं सर्व्हेलन्स नाही. ट्रेसिंग, ट्रॅकिंग यांच्याकडे राज्याचं दुर्दैवाने दुर्लक्ष आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. आता तरी राजकारणाच्या बाहेर राहा. आरोग्यमंत्री म्हणतात की, वॅक्सीनचे डोस कमी मिळाले. वस्तुस्थिती ही आहे की ५४ लाख डोस मिळाले. यापैकी महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत फक्त ४४ टक्केच डोस वापरले. प्रत्येक वेळेला, याही विषयात राजकारण करणं आता बंद करा. केंद्राने दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करा, आणि केंद्राने हेही म्हटलंय, नाईट कर्फ्यू आणि लॉकडाऊन हे याच्यावरचे खरे उपाय नव्हेत. त्यामुळे, राज्य सरकार फक्त लॉकडाऊनची भाषा करतंय. त्यामुळे राज्य सरकारची अवस्था आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशा प्रकारची आहे. राज्याने या विषयात अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.” अशी सडकून टीका भातखळकरांनी केली आहे.

हेही वाचा:

वॅक्सीन गोदामात ठेऊन ठाकरे सरकार करतय लॉकडाऊनचा विचार

परमबीर सिंह यांची हकालपट्टी, रजनीश सेठ मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

शरद पवारांनीच अनिल देशमुखांची हकालपट्टी करावी- किरीट सोमैय्या

राणे बंधूंनी पुन्हा घेतला वरूण सरदेसाईचा समाचार

“महाराष्ट्र कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या तोंडावर. ठाकरे सरकारची अनास्था जनता भोगते आहे. ट्रेसिंग, ट्रॅकिंगकडे दुर्लक्ष होते आहे. राज्य सरकार केवळ आरोपप्रत्यारोपाच्या राजकारणात दंग. कोविडच्या दिलेल्या लसी वापरल्या जात नसताना केंद्राकडून लसी मिळत नसल्याचे खोटेनाटे आरोप सुरू आहेत.” असे ट्विटही भातखळकरांनी केले आहे.

Exit mobile version