25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारणठाकरे सरकारकडून दोन दिवस आधीच जनतेचा एप्रिल फुल

ठाकरे सरकारकडून दोन दिवस आधीच जनतेचा एप्रिल फुल

Google News Follow

Related

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी चांदीवाल चौकशी समिती स्थापन करून, राज्य सरकारने १ एप्रिलच्या २ दिवस आधीच जनतेला अक्षरश: एप्रिल फूल बनवल्याची टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलीय. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांबाबत चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्तीची एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्यावर भाजपने जोरदार टीका केलीय.

“मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पाठवलेल्या पत्राला अनेक दिवस उलटले तरी सरकार ढिम्म होतं. मात्र, उच्च न्यायालयात याचिकेची सुनावणी होणार हे दिसल्यानंतर राज्य सरकारने बुधवारी कैलास चांदीवाल समिती स्थापन केली. ही समिती, चौकशी आयोग अधिनियम, १९५२ अंतर्गत नेमलेली नाही. त्यामुळे या समितीला कोणालाही नोटीस बजावण्याचा अधिकारच नाही. तसेच समितीकडून संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावल्यावर उपस्थित राहीलेच पाहिजे असे बंधनही नसेल. त्यामुळे ही समिती म्हणजे केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून एप्रिल फूल बनवण्याचा प्रकार आहे”, अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे.

हे ही वाचा:

गृहमंत्र्यांविरोधात एफआयआर दाखल का केला नाही? उच्च न्यायालयाचा परमबीर सिंह यांना सवाल

शिवसेनेला ‘हिंदुहृदयसम्राटांचा’ विसर….नावे फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची

ममतांवर ‘गोत्र’ सांगण्याची वेळ

ममता बॅनर्जींच्या उलट्या बोंबा

“लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा गृहमंत्र्यांच्या अखत्यारित येतो. असे असताना या विभागाकडे परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सोपवली तर ती निःष्पक्ष असेल याची अजिबात खात्री नाही . ज्या प्रमाणे महावसूली सरकारने मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडून फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल जसा हवा होता तसा तयार करून घेतला. त्याचप्रमाणे आता या चांदीवाल समितीकडून सुद्धा आपल्याला हवा तसा अहवाल तयार करून घेतला जाण्याचीच अधिक शक्यता असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा