ठाकरे सरकारला मराठा समाजाबद्दल आस्था नाही

ठाकरे सरकारला मराठा समाजाबद्दल आस्था नाही

महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजा बद्दल आस्था नाही, हे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला २०२१–२०२२ सालाकरिता फक्त साडे बारा कोटी रुपये तरतूद करुन दाखवुन दिलं आहे, असा आरोप माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केलाय. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे साडे बारा कोटी रुपये एक सप्टेंबरला वर्ग करत असल्याचं एक परिपत्रक मला मिळालं आहे, अशी माहिती पाटील यांनी दिलीय. ते कराडमध्ये बोलत होते.

राज्यातील ३० हजार युवा उद्योजकांना या योजनेतून २०० कोटी रुपयांचं कर्ज वाटत करण्यात आलेलं आहे. दर महिन्याला ८ कोटी, तर दरवर्षी ९६ कोटी रुपये व्याज परतावा केला जातो. या योजनेसाठी राज्य शासनाकडून केवळ साडे बारा कोटींची तरतूद केल्याने उद्योजक अडचणीत येणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सरकारमध्ये जे लोक बसलेले आहेत ते काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का? ते मराठा समाजाबद्दल ब्र सुध्दा काढत नाहीत, अशी खंतही नरेंद्र पाटील यांनी यावेळी व्यक्त केलीय.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे, शरद पवार पाठीत खंजीर खुपसणारेच

अनिल देशमुख यांनी दरोडा घालयचा आणि पोलिसांनी काय हार घालयचा का?

अनिल देशमुखांच्या वकिलालाच अटक

बिग बॉस १३ चा विजेता कालवश

दरम्यान, नरेंद्र पाटील यांनी आपल्या हातावर ‘देवेन्द्र’ हे नाव कोरले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरुनच नरेंद्र पाटलांनी हा टॅटू बनवून घेतला आहे. देवेंद्र फडणवीस सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा भावना नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केल्या. नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

Exit mobile version