महाराष्ट्र सरकारने दोन डोस घेतलेल्यांना येत्या १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करण्यास मुभा दिली आहे. मात्र, हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाशी चर्चाच केली नसल्याचं उघड झालं आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तसे सुतोवाचही केलं आहे.
रावसाहेब दानवे माध्यमांशी संवाद साधताना हे स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकलबाबत जो निर्णय घेतला आहे. त्याचं स्वागतच आहे. राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे येत्या १५ ऑगस्टपासून आम्ही काही प्रमाणात लोकल सुरू करू. कोरोनाची स्थितीही आता आटोक्यात आली आहे. पण निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वेशी थोडी चर्चा केली असती तर बरं झालं असतं. पण तरीही सरकारच्या या निर्णयाला रेल्वे प्रतिसाद देईल, असं दानवे यांनी म्हटलं आहे.
रेल्वेची भूमिका स्पष्ट आहे. प्रवासी तपासून आत सोडण्यात येईल. आम्ही लोकल सुरू करण्यास सज्ज आहोत. मात्र, प्रवाशांचे प्रमाणपत्रं तपासण्यासाठी राज्य सरकारनेही स्वत:ची यंत्रणा उभी केली पाहिजे. ही राज्याचीही जबाबदारी आहे, असं ते म्हणाले. आमची कसली नाराजी नाही. उलट आम्ही खूश आहोत. ज्या अडचणी येतील त्या चर्चेतून सोडवता आल्या असत्या, असंही ते म्हणाले.
हे ही वाचा:
अंध मोदी विरोधक यातून बोध घेतील का?
उद्धव ठाकरेंच्या प्रेरणेने तलवार नाचवली
मुख्यमंत्र्यांच्या भाषणात रेल्वेनिर्णयाचा एकच डोस, बाकी ओस
केवळ दोन डोस घेतलेल्यांनीच मॉलमध्ये जा…..वाचा सविस्तर!!
राज्यातील नेते भेटण्यासाठी आले आहेत. ही केवळ सदिच्छा भेट आहे. कोणताही संघटनात्मक बदल होणार नाही. कोणताही राजकीय अर्थ काढण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येकाच्या घरी जातो तसंच ते माझ्या घरी येणार आहेत. त्यामुळे त्याचा राजकीय अर्थ काढू नका, असं आवाहन त्यांनी केलं.