ठाकरे सरकार, बोल बच्चन सरकार

ठाकरे सरकार, बोल बच्चन सरकार

भाजपाचे प्रदेश महामंत्री आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ठाकरे सरकार हे बोल बच्चन सरकार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मुंबईपर्यंत, तर उपमुख्यमंत्री हे पुण्यापर्यंतच सीमित असल्याची घणाघाती टीकाही बावनकुळे यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारचा, पालकमंत्र्यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवैध धंदे फोफावले आहेत. नाना पटोले स्वत:ला ओबीसींचा नेता म्हणतात. मात्र, ओबीसींचे प्रश्न मार्गी लावत नाहीत. त्यांना ओबीसी समाजाबाबत येवढाच कळवळा असेल तर पटोले यांनी ताबडतोब सरकारमधून बाहेर पडावं, असं आव्हानही बावनकुळे यांनी पटोलेंना दिलंय. भारतीय जनता युवा मोर्चाच्या “युवा वॉरिर्यस” शाखेच्या उदघाटन निमित्ताने बावनकुळे भंडारात आले होते.

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात अध्यादेश काढण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. यापूर्वीच्या १८ महिन्यात सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. आता अध्यादेशामध्ये काय राहील हे पाहावे लागेल. मात्र, आमची सरळ मागणी आहे की ओबीसींचं राजकीय आरक्षण कायम राहिलं पाहिजे. सध्याच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्या रद्द करुन त्यातही ओबीसींचं पूर्ण आरक्षण लागू केलं पाहिजे, अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.

हे ही वाचा:

मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा असा होणार लिलाव

फ्रान्सला मागे टाकत भारतीय शेअर बाजार सहाव्या क्रमांकावर

पाकिस्तानमध्ये सामना सुरु होण्यापूर्वी मालिकाच रद्द

अफगाणिस्तानात ‘घटना’ कट्टरतेची जाणीव करून देणारी

सरकारमध्ये काही लोक झारीतील शुक्राचार्य आहेत. ते ओबीसी आरक्षणाला विरोध करत आहेत. काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी यांनीच तसा आरोप केला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही, असं वंजारी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेस जर ओबीसींच्या बाजूने आहे तर ओबीसी विरोधी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत कशी आहे? असा सवाल करतानाच ओबीसींचा एवढाच कळवळा असेल तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं, असं आव्हानच बावनकुळे यांनी काँग्रेसला दिलं होतं.

Exit mobile version