भाजपा नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मोठं विधान केलं आहे. सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला. तसं राज्यातील आघाडी सरकार कधीही कोसळेल. तेही कळणार नाही. तसे संकेत आहेत, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. दरेकर यांनी हा बॉम्बगोळा टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मीडियाशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी हा दावा केला आहे. काल सह्याद्री अतिथीगृहाचा स्लॅब कोसळला होता. त्याबाबत विचारलं असता दरेकर यांनी ही कोटी करत दावा केला. सह्याद्रीचा स्लॅब कोसळला आहे. स्लॅब कोसळतो आणि सरकारला माहीतही पडत नाही. तसंच हे सरकार कधीही कोसळेल. ते कळणारही नाही. तसे संकेत आहेत, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. राज्यात त्यांना आणि भाजपाला मोठा जनाधार आहे. त्यामुळे आम्हाला फ्रस्टेशन कशाचं असेल? फ्रस्टेशन फक्त सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावर आहे, असं दरेकर म्हणाले.
राज्यात १८ जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आलं आहे. त्यावरही त्यांनी मत व्यक्त केलं. अनलॉकबाबत काढण्यात आलेलं परिपत्रक ढोबळ पद्धतीने काढलं आहे. त्यात जिल्ह्यांबाबतचे निकष दिसत नाहीत, असं सांगतानाच मंदिर उघडण्याबाबतची सरकारची भूमिका विरोधी आहे. मंदिर उघडण्यासाठी सरकारचं मनोधैर्य का होत नाही?, असा सवाल त्यांनी केला. वारकरी आणि मंदिर या प्रश्नावर सरकारची अनास्था दिसते. सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. सरकारकडून मेळावे घेतले जातात. वारकरी संप्रदाय असेल किंवा मंदिर असेल यांचा प्रश्न आला की नियम दाखवले जातात, असा आरोपही त्यांनी केला.
हे ही वाचा:
जगभरात झालेल्या विनाश आणि मृत्यूमुळे चीनने १० ट्रिलियन डॉलर्स भरपाई द्यावी
रा.स्व. संघाच्या अनेक नेत्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ट्विटरचा वार
उपराष्ट्रपती वेंकय्या नायडूंच्या अकाउंटवरील ‘ब्लू टीक’ ट्विटरने काढली
बीडमध्ये कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला, तरी मोर्चा निघणार
महापालिकेच्या ग्लोबल टेंडरवरून त्यांनी पालिकेवर टीका केली. ग्लोबल टेंडर रद्द झालं आहे. त्यामुळे महापालिकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हं निर्माण झाला आहे का? असा सवाल करतानाच निविदा प्रक्रियाते चांगल्या कंपन्या येणे अपेक्षित होते, असंही ते म्हणाले.