अवघ्या दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर ठाकरे सरकारला जाग येऊन राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष मिळाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातील महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
महाराष्ट्रात एकीकडे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. या गोष्टीवरून ठाकरे सरकारवर वारंवार चौफेर टिका होताना दिसून आली. दिवसेंदिवस राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच राज्यातील महिला आयोगाचे पद रिक्त असल्याने सर्वांनाच गैर वाटत होते. राष्ट्रीय महिला आयोगाकडूनही याची दखल घेतली गेली असून त्याबद्दल ठाकरे सरकारवर ताशेरे ओढण्यात आले होते.
हे ही वाचा:
आर्यन खानचे काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी
सहकारी साखर कारखान्यांना मिळणार नवसंजीवनी
बापरे! डॉक्टरांनी ‘किडनी स्टोन’ ऐवजी ‘किडनी’च काढली
काँग्रेसच्या नव्या नियुक्त्यांत पटोले समर्थकांचे ‘लोंढे’; सचिन सावंतांचा नाराजीनामा
या टीकेनंतर आता ठाकरे सरकार जागे झाले असून त्यांनी रूपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत. या आधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजपाच्या विजया रहाटकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी होत्या. पण नोव्हेंबर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील सर्व महामंडळे आणि आयोगांवरील नियुक्त्या रद्द केल्या. त्यामुळे महिला आयोगाचे अध्यक्ष पदही रिक्त झाले होते. ज्यावर आता रूपाली चाकणकर यांची नियुक्ती झाली आहे.