उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना काढले महाविकास आघाडीतून ‘बाहेर’

बावनकुळे यांचे हे आव्हान उद्धव ठाकरे यांनी थोड्या बहुत फरकाने पेलले

उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना काढले महाविकास आघाडीतून ‘बाहेर’

मालेगावमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांचे बेगडी सावरकर प्रेम अचानक उफाळून आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांचे कान टोचले. उद्धव ठाकरे यांच्या या ‘अचानक’ भूमिकेनंतर हिंमत असेल तर सावरकरांची बदनामी करणाऱ्या काँग्रेसपासून वेगळं होऊन दाखवा, असं आव्हान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं होतं. बावनकुळे यांचे हे आव्हान उद्धव ठाकरे यांनी थोड्या बहुत फरकाने पेलले आहे. उद्धव ठाकरे हे स्वतः काँग्रेसमधून वेगळे झालेले नाही पण त्यांनी राहुल गांधी यांनाच महाविकास आघाडीमधून बाहेर काढले आहे.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अनेकदा अपमान झाला. सत्तेत असतांना पासून ते आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी निषेधाचा ब्र देखील आतापर्यंत काढला नव्हता. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत वेळोवेळी सावरकरांचा अपमान करत होते. सावरकरांनी सुटकेसाठी ब्रिटिशांची माफी मागितली होती असे वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावेळी संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली अनेक ठिकाणी निदर्शनेही झाली. पण त्यावेळी देखील उद्धव ठाकरे यांनी बोटचेपी भूमिका कायम ठेवत थंड बसणे पसंत केलं.

उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले की काय अशी टीकाही झाली. आता राहुल गांधी यांनी ‘मी सावरकर नाही गांधी आहे, गांधी कधी माफी मागत नाही ‘ असे वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर पुन्हा राज्यभरात रणकंदन माजले आहे. आता आपण भूमिका मांडली नाही तर काही खरे नाही अशी उपरती झाली होऊन त्यांनी मालेगावच्या सभेत उसने सावरकरप्रेमी दाखवले.

हे ही वाचा:

नाटू नाटू गाण्याचे प्रसिद्ध संगीतकार एम. एम. किरवाणींना झाला कोरोना

बोरिवलीत राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन 

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक पुन्हा चर्चेत

देशात चर्चा असलेल्या गुंड अतीक अहमदला आज काय शिक्षा होणार? फाशीची मागणी

सावरकरांबद्दलचा आदर दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न

उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगर मध्ये रविवार २ एप्रिल रोजी सभा होत आहे. औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर महाविकास आघाडीची पहिली सभा होत आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्ररित्या १० जूनपर्यंत महाविकास आघाडीच्या सभा एकत्र घेण्याचा निर्णय झालेला आहे. ही सभा त्याचाच एक भाग आहे. ‘वज्रमूठ महाविकास आघाडीची’ अशी या सभेची टॅगलाईन आहे. या सभेचा टिझर लाँच झाला आहे. पण या टीझरमधून राहुल गांधी यांनाच डच्चू देण्यात आला आहे. राहुल गांधी यांना टीझरमधून बाहेरचा रास्ता दाखवत उद्धव ठाकरे यांनी सावरकरांबद्दलचा आदर दाखवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

सोनिया गांधी इन, राहुल गांधी आऊट

या सभेसाठी उद्धव ठाकरे गटाने ४५ मिनिटांचा टिझर तयार केला आहे. महाविकास आघाडीची पहिली सभा छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.टीझरमध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी , बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार आणि नाना पटोले आहेत. मात्र यात राहुल गांधी दिसत नाही आहेत. यामध्ये राहुल गांधींना स्थान न देता सोनिया गांधींची दृश्यं लावण्यात आली आहेत. टीझरच्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे दोनवेळा, नाना पटोले एकदा, बघायला मिळतात. पण राहुल गांधी यांना मात्र टीझरमध्ये प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे.

Exit mobile version