लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरेंनी प्रचंड मेहनत घेतली परंतु त्यांच्या पक्षापेक्षा मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच याचा जास्त फायदा झाल्याचे दिसते, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.उद्धव ठाकरेंनी याच आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आपल्या हाताशी काय लागलं याचा विचार केला पाहिजे.एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुकही केलं आणि सल्लाही दिला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपसोबत शिवसेनेची होती तेव्हा त्यांना २३ जागा लढायला मिळाल्या होत्या आणि त्यापैकी १८ जागा ते जिंकले.लोकसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक मेहनत उद्धव ठाकरेंनी घेतली.माझे मित्र असल्या कारणाने मला त्यांच्या तब्बेतीची काळजी आहे.पण तरीही ते खूप फिरले मात्र केवळ त्यांना ९ जागा मिळाल्या.जर २०१९ मध्ये युती तशीच राहिली असती तर ज्यांना घरी जायचे होते, वाटेत थांबायचेच न्हवते (काँग्रेस-राष्ट्रवादी) त्यांना मात्र १३ आणि ८ जागा मिळाल्या.
हे ही वाचा:
लोकसभा निवडणुकीत बनावट पासपोर्ट वापरून मतदान, चार बांगलादेशींना अटक!
बुधवारी चंद्राबाबू नायडू घेणार आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
मोदींच्या शपथविधीला मनसेला निमंत्रण नाही? मुनगंटीवार म्हणाले…
केजरीवाल, आम्हाला आमचे हजार रुपये द्या… महिलांनी दिल्ली सरकारला घेरलं
ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी याचे आत्मपरीक्षण केलं पाहिजे.मी काही त्यांना सल्ला देणारा माणूस नाही, परंतु आपण यामध्ये काय मिळवलं, हाताशी काय लागलं याचा विचार केला पाहिजे.एका बाजूने अल्पसंख्यांकांच्या मतावर निवडून आलेले असा ठपका तर त्यांच्यावर बसला.त्यानंतर हा भगवा विजय नसून हिरवा विजय आहे, असं मनसेच्या नेत्याकडून चांगलं ट्विट करण्यात आलं होत.दुसऱ्या बाजूने त्यांच्या १८ जागांच्या ९ जागा झाल्या.तिसऱ्या बाजूने म्हणजे २०१९ नंतर युती तशीच राहिली असती तर ही सगळी वातावात झाली नसती.म्हणून यामध्ये काँग्रेस-राष्ट्र्रवादीने स्वतःचा फायदा बक्कळ करून घेतल्याचे दिसून येते , असे पाटील म्हणाले.