खासदार कृपाल तुमाने यांचा टोला
उद्धव ठाकरे यांनी एका माणसासाठी पक्ष पणाला लावला, पण अजुनही वेळ गेलेली नाही असा टोला शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला आहे.
आमचे ४० आमदार आणि आम्ही वारंवार उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडा असे सांगत होतो. पण ते त्यासाठी तयार नव्हते. आम्ही कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही. एका माणसासाठी त्यांनी पक्ष पणाला लावला, असे शरसंधान शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केले.
आज शिवसेनेची काय स्थिती आहे, हे सर्व जण पाहत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. आताही ते महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर चित्र बदलू शकते, असेही तुमाने यांनी सांगितले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपसोबत निवडणूक लढलो होतो आणि आता आम्ही शिवसेनेमध्येच आहोत असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर
बजरंग दलाने कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयावर लिहिले हज हाऊस
राष्ट्रीय पुरस्काराने वाढवली आणखी दर्जेदार चित्रपट निर्मितीची जबाबदारी
चीनमध्ये बँकिंग संकट; नागरिकांना रोखण्यासाठी बँकांसमोर रणगाडे तैनात
शिवसेनेला पुढे नेण्यासाठी काम करू
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली आहे. आम्ही फक्त गटनेता बदलला बाकी सर्व शिवसेनेतच आहोत. शिवसेनेची सर्व कार्यकारिणी येथे आलेली आहे. हे तर मला माहितीसुद्धा नव्हते, पण विमानतळावर पोहोचल्यानंतर सर्व जण मला येथे भेटले. भविष्यातही आम्ही शिवसेनेला पुढे नेण्यासाठी काम करू. आम्ही आजही शिवसेनेतच आहोत, असेही खासदार तुमाने यांनी म्हटले आहे.