ठाकरे म्हणतात, भाजपासोबत पॅचअप करू शकलो असतो पण…

नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

ठाकरे म्हणतात, भाजपासोबत पॅचअप करू शकलो असतो पण…

“भाजपासोबत पॅचअप करू शकलो असतो. पण माझ्या नितीमत्तेत बसत नव्हतं,” असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या बैठकीत केले. शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची बैठक पार पडली यावेळी उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केले.

 

“मी भाजपशी पॅचअप करू शकलो असतो. पण माझ्या नितीमत्तेत बसत नव्हतं. २०१४ पासून ज्यांनी फसवलं त्यांच्यासोबत कसं जाणार? मी मुख्यमंत्री होतो. माझ्या आमदारांना डांबून ठेवू शकलो असतो. पण जे मनाने फुटले त्यांना डांबून काय करणार होतो? त्यांना काय कमी केलं होतं?” असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपासंबंधी वक्तव्य केले.

 

जुने निष्ठावंत सोडून जातात त्याचे वाईट वाटते. मात्र, तुमच्या पैकी कुणाला जायचे असेल तर जाऊ शकता. मी खंबीर आहे. आपण पुन्हा सत्तेत येणार आहोत, असं उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले. ज्यांनी २०१४ पासून आपल्याला फसवलं, २०१४ विधानसभा, २०१७ मुंबई महापालिका आणि २०१९ साली मातोश्रीत दिलेला मुख्यमंत्री पदाचा शब्द नाही पाळला नाही. त्यांच्यासोबत कसे काय जाणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा:

मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड

चांद्रयान- ३ मोहिमेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला बळ

चांद्रयानात इस्रोकडून एआय तंत्रज्ञानाचा वापर

विजयाच्या चंद्रपथावर चालण्याचा हा क्षण!

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आढावा बैठक आयोजित केली असून या बैठकीत विदर्भातील लोकसभेच्या जागांचा आढावा घेतला जाणार आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या यवतमाळ- वाशिम मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच इतर मतदारसंघावरही चर्चा होणार आहे.

याआधी मनसेशी उद्धव ठाकरे युती करणार का, याची चर्चा रंगली होती. त्यावेळी मी मनसेशी युती केली तर कार्यकर्ते काय म्हणतील? ज्यांनी पक्षासाठी रक्त सांडले त्यांच्या मनात काय विचार येतील असा विचार करून आपण युतीचा विचार केला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

 

शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. ते याआधी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. पण आता त्यांनी पुन्हा उद्धव यांना साथ देण्याचे ठरविले आहे. त्यावेळी वाघचौरे यांनी पक्ष सोडला होता पण त्यांनी पक्ष फोडला नव्हता त्यामुळे ते पापी नाहीत, असा दावा उद्धव यांनी केला.

Exit mobile version