दिल्ली उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे शिवसेना चिन्ह गोठवण्याविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने निवडणूक आयोगाला अंतिम निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.
ऑक्टोबरच्या सुरुवातीला निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं होतं. त्यानंतर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अंधेरी पोटनिवडणूक पार पडल्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळावं, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. याप्रकरणी सोमवारी सुद्धा न्यायालयात सुनावणी झाली होती.
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी गोठवण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला अंतरिम आदेश बेकायदा असून हा आदेश रद्द करण्यात यावा, अशी विनंती सोमवारी ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयाकडे केली होती. दोन्ही पक्षकारांनी लेखी स्वरूपात ठळक मुद्दे मांडावेत, असे सांगत उच्च न्यायालयाने मंगळवारी पुढील सुनावणी ठेवली होती.
हे ही वाचा :
क्रोएशियातही आता मल्लखांब रोवला!
विनयभंगप्रकरणी आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर
प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असले पाहिजे
हेमंत सोरेन चौकशीला या! ईडीने पाठवले दुसरे समन्स
त्यानुसार आज, १५ नोव्हेंबर रोजी सुनावणी पार पडली असून, ठाकरे गटाची याचिकाचं न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच यासंदर्भात निवडणूक आयोग जो निर्णय घेईल तोच योग्य असेल, असं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. निवडणूक आयोगाला अंतिम निर्णय घायचे आदेश न्यायालायने दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर कधी निकाल देणार यांसदर्भात माहिती समोर आलेली नाही.