व्हीपला आम्ही मानणार नाही, आम्ही घाबरत नाही… ठाकरे गटाचा पवित्रा

शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी बजावला व्हीप; अर्थसंकल्पीय अधिवेशन

व्हीपला आम्ही मानणार नाही, आम्ही घाबरत नाही… ठाकरे गटाचा पवित्रा

सध्या महाराष्ट्रात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून त्यात व्हीपच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. या अधिवेशनासाठी शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी आपल्या आमदारांना व्हीप बजावला आहे. पण उद्धव ठाकरे गटातील आमदारांनी हा व्हीप मानणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत.

२६ फेब्रुवारीला हा व्हीप गोगावले यांनी बजावला आहे. व्हीपचे पालन केले नाही, तर कारवाई केली जाईल, असेही गोगावले यांनी म्हटले आहे. दोन आठवड्यात ही कारवाई केली जाईल, असेही गोगावले म्हणाले आहेत. मात्र ठाकरे गटाकडून या व्हीपला मान्य न करण्याचे धोरण आहे. अर्थात, सध्या कारवाई होणार नसली तरी नंतरच्या काळात कारवाई झाली तर काय, अशी चिंता ठाकरे गटाला नक्कीच सतावते आहे.

हे ही वाचा:

‘वंदे भारत’ वर पुन्हा फेकले दगड

संशयास्पद व्यक्तीवर लक्ष ठेवा!! NIAने केले मुंबई पोलिसांना सतर्क

मरीन ड्राइव्ह वरून वरळीला जा अवघ्या आठ मिनिटांत , तेही टोलशिवाय.

होळी रे होळी, नियमांची गोळी! अश्लील गाणे, टोमणे व रंगीत पाणी शिंपडलेत तर याद राखा

यासंदर्भात ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू म्हणाले की, आम्ही हा व्हीप पाळणार नाही. न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे. ते केले नाही तर तो न्यायालयाचा अवमान होईल. जर कारवाई झाली तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी व्हीप मान्य करणार नसल्याचे म्हटले आहे.

म्हटलं जातं की, कोंबडी कधी आगीला घआबरत नसते. नानातऱअहेने व्हीप दिला अशा बातम्या करून आम्हाला घाबरवू पाहात असेल. त्.ला कोंबडी हूल म्हणतात आम्ही त्.ला भीक घालत नाही, शिंदे गटाच्या लोकांना शेड्युल टेनचा उल्लेख करण्याचा अधिकार नाही. पक्षांतरबंदी विरोधी कायदा अटलबिहारी वाजपेयींच्या काळात झाला. त्यात शेड्युल टेन जाणीवपूर्वक टाकले. आमचं मुख्यमंत्रीपद गेलं, आमदार सोडून गेले. खासदारही गेले. माझे घर जाळण्याचा प्रयत्न झाला पण आम्ही घाबरलेलो नाही मग या व्हीपमुळे कसे काय घाबरून जाऊ.

Exit mobile version