अंधेरी पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी

उमेदवारी मागे घेण्याची कार्यकर्त्यांनी धमकीही दिली असल्याचा आरोप मिलिंद कांबळे यांनी केला आहे.

अंधेरी पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी

मुंबईतील आगामी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. सध्या ही पोटनिवडणूक रद्द होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जातं आहे. या पोटनिवडणुकीतील एका उमेदवाराने ठाकरे गटाविरुद्ध केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहे. या पत्राद्वारे त्या उमेदवाराने ठाकरे गटावर गंभीर आरोप केले असून, निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून मिलिंद कांबळे हे निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणला जातं असल्याचा आरोप मिलिंद कांबळे यांनी केला आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक रद्द करण्यात यावी अशी मागणी मिलिंद कांबळे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

अन्य अपक्ष उमेदवारांवरही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दबाव टाकून त्यांनाही निवडणूक प्रक्रियेतून माघार घेण्यास भाग पाडले. उमेदवारी मागे घेण्याची कार्यकर्त्यांनी धमकीही दिली असल्याचा आरोप मिलिंद कांबळे यांनी केला आहे. त्यामुळे पोट निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी मागणी मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

हे ही वाचा:

मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाउंट हॅक

दुबईहून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन बहिणींना मुंबईतून अटक

आईच्या कुशीतून पळवलेल्या ३ महिन्याच्या चिमुरडीची दाम्पत्याच्या तावडीतून सुटका

एलॉन मस्क आता ‘ट्विट चीफ’, ताबा मिळताच सीईओंना कंपनीतून बाहेरचा रस्ता

केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे.
भारतीय जनता पार्टीने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली, तरी अनेक अपक्ष उमेदवार या पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

Exit mobile version