उद्धव ठाकरे गटाची गळती थांबण्याची काही चिन्हे नाहीत. एकनाथ शिंदे ४० आमदारांसह बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरेंचे नेतृत्व झुगारून अनेक नेते शिंदे यांच्या सोबत गेलेले आहेत. आता जोगेश्वरीचे नगरसेवक प्रवीण शिंदे हे शिवसेनेत अर्थात एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार आहेत.
उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. रवींद्र वायकर यांचे निकटवर्तीय असलेले शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असून ते मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करतील. प्रवीण शिंदे हे नगरसेवक असून बेस्ट समितीचे चेअरमनही आहेत.
कारमधील एअरबॅग ‘गहाळ’ केल्याप्रकरणी आनंद महिंद्रा आणि अन्य १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !
मोदी सरकारला गेल्या ९ वर्षातील कामाचे १० पैकी आठ गुण
काँग्रेस म्हणजे गंजलेले लोखंड!
सुधा मूर्तींच्या नावावर अमेरिकेतील महिला करत होती वसुली
उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्यात नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. नुकतीच या दोन महिला नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचे ठरवले. त्यामुळे एकूणच ठाकरे गटाची गळती काही थांबण्याची चिन्हे नाहीत.
१६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या विधानसभा अध्यक्षांपुढे सुनावणीसाठी आहे. त्याच दरम्यान आता हा आणखी एक धक्का ठाकरे गटाला बसला आहे.