शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आले आहेत.ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या पक्षनिधीमधून ५० कोटी काढण्यात आल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ईओडब्ल्यूकडे तक्रार करण्यात आली होती.या संदर्भात चौकशीसाठी ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांना ५ मार्च रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच खरी शिवसेना घोषित केल्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले.शिवसेना ही शिंदे गटाकडे गेल्यानंतर सुद्धा पक्षाच्या निधीतून ठाकरे गटाने ५० कोटी काढण्यात आले, असा आरोप शिंदे गटाचा आहे.या संदर्भात मुख्यमंत्री शिंदेनी ईओडब्ल्यूकडे तक्रार दाखल केल्यानंतर अनिल देसाईंना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावण्यात आले आहेत.५ मार्च रोजी अनिल देसाई यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
हे ही वाचा:
वातावरण बदलाचा परिणाम वेळास कासव महोत्सवावर
४ दिवसांत ४०० जेट, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये जमले खास सेलिब्रिटी!
बारामतीमधील महा रोजगार मेळाव्याच्या मंचावर रंगला टाळाटाळीचा खेळ
केसीआरला धक्का! दोन दिवसात दोन खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश!
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच याबाबत विधानसभेत भाष्य केले होते.या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता निशाणा साधला होता.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्हाला खोके-खोके म्हणणारे, त्यांनी आमच्याच खात्यातून ५० कोटी घेतले आहेत.या प्रकरणाची आता चौकशी सुरू आहे.शिवसेनेच्या खात्यातले ५० कोटी घेतले, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
ते पुढे म्हणाले, शिवसेना अधिकृतपणे आमच्याकडे आहे, धनुष्यबाण आमच्याकडे आहे.खोके पुरत नाही म्हणून.., अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.दरम्यान, यासंदर्भात चौकशीसाठी अनिल देसाई ५ मार्च हजर राहण्याचे आदेश मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून देण्यात आले आहेत.अनिल देसाई चौकशीसाठी सामोरे जातील का, हे महत्वाचं ठरणार आहे.