ठाकरे गटाचे अनिल परब, अभ्यंकर विजयी तर भाजपाच्या डावखरेंची हॅट्ट्रिक

विधानपरिषदेची निवडणूक

ठाकरे गटाचे अनिल परब, अभ्यंकर विजयी तर भाजपाच्या डावखरेंची हॅट्ट्रिक

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि कोकण मतदार संघातून अनुक्रमे ठाकरे गट आणि भाजपाला यश मिळाले आहे. शिक्षक गटात ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर यांनीही विजय मिळविला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब हे विजयी झाले आहेत तर कोकण मतदारसंघातून अर्थात ठाण्यात निरंजन डावखरे यांनी बाजी मारली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल आलेला नव्हता. त्यात शिंदेंच्या शिवसेनेचे किशोर दराडे आणि ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांच्यात लढत आहे.

डावखरे यांनी सलग तिसऱ्यांदा ही निवडणूक जिंकली आहे. डावखरे यांनी पहिल्या दोन फेऱ्यांत ३५ हजार मते पडली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी रमेश कीर यांना फक्त ७ हजार मते होती. त्यावेळीच डावखरे यांचा विजय निश्चित मानला जात होता.

हे ही वाचा:

न्यायसंहितेने अधोरेखित केले; दहशतवादाचे अर्थकारण

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करा

न्यायसंहितेने अधोरेखित केले; दहशतवादाचे अर्थकारण

धर्मवीर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

पदवीधर मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते अनिल परब हे विजयी ठरले. त्यांनी भाजपाच्या किरण शेलार यांच्यावर मात केली. अनिल परब यांनी मोठ्या फरकाने ही निवडणूक जिंकली.

 

Exit mobile version