ठाकरे सरकारकडून आज सादर करण्यात आलेल्या योजना म्हणजे भारतीय जनता पार्टीने यापूर्वी केलेल्या घोषणांचाच पाढा यंदाच्या अर्थसंकल्पात वाचला गेला आहे. अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
आज ठाकरे सरकारने अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पनंतर लगेचच मविआ सरकारने प्रतिक्रिया दिली.आणि जेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया देऊ लागले तेव्हा माध्यमांचे इंटरनेट गेले. आता खरच इंटरनेट गेले की माविआ सरकारने काय केले अशी सुरवातीलाच टीका फडणवीस यांनी केली. मग पुढे त्यांनी अर्थसंकल्पावर टीका करायला सुरवात केली.
ठाकरे सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या चार बातम्या तयार होतील. बाकी पुढे काहीच होणार नाही या अर्थसंकल्पाचे,अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले,” ठाकरे सरकारने आमच्याच योजना या अर्थसंकल्पात मांडल्या आहेत. हेच नेते एकेकाळी या योजनांना विरोध करत होते,आता त्याच भाजपाच्या योजनांचे हे सरकार श्रेय घेत आहे. तर शेतकऱ्यांना या बजेटमधून काहीही मिळालेले नाही. शेतकऱ्यांच्या जीवावर विमा कंपन्या हे सरकार चालवत आहे. तसेच बजेटमधून बारा बलुतेदारांना काहीही मिळालेले नाही. तर एसटी कामगारांचा विलिनीगीकरणाची मागणी तर फेटाळून लावलीच परंतु बजेटमधूनही त्यांना कोणत्याच नवीन योजना दिलेल्या नाहीत. ”
हे ही वाचा:
आज सादर होणार ठाकरे सरकारचा तिसरा अर्थसंकल्प
निवडणूक विजयानंतर पंतप्रधान मोदींचा अहमदाबादमध्ये रोड शो
निष्पक्ष संस्थांना बदनाम करण्यासाठी भ्रष्टाचाऱ्यांची इको सिस्टीम
योगी पुन्हा मुख्यमंत्री होणार, मग मुनव्वर राणा कुठे जाणार?
देशातील २२ राज्यांनी पेट्रोल डिझेल वरचा कर कमी केला आहे. केंद्रानेही पेट्रोल डिझेलचा कर कमी केला आहे. पण महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात असेही काहीही घडलेले नाही. तर महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भसाठी ठाकरे सरकारने कोणत्याही नवीन योजना आणलेल्या नाहीत. उत्तर महाराष्ट्राला तर अर्थसंकल्पातून वगळूनच टाकले आहे. आम्ही सर्वजण ठाकरे सरकारच्या बजेटचा धिक्कार करत आहोत. असे फडणवीस म्हणाले आहेत.