सरकारला आली जाग! औरंगाबादचे संभाजीनगर करणार

सरकारला आली जाग! औरंगाबादचे संभाजीनगर करणार

शिवसेनेचे अनेक नेते बंडखोर होऊन गुवाहाटीमध्ये आहेत. यामुळे ठाकरे सरकार धोक्यात आलं असून, ठाकरे सरकार लागोपाठ अनेक निर्णय घेत आहे. औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर ठेवण्याचा प्रस्ताव बुधवार, २९ जून रोजी राज्य मंत्री मंडळात मांडणार असल्याचं परीवहन मंत्री अनिल परीब यांनी माहिती दिली आहे.

अनेक वर्षांपासून औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हावं यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र एवढ्या वर्षात हा निर्णय झाला नाही. मात्र ४० हुन अधिक शिवसेनेचे आमदार बंडखोर झाले आणि एकामागून एक ठाकरे सरकार निर्णय घ्यायला लागले आहे. बंडखोर आमदार गुवाहाटीत आहेत तर दुसरीकडे मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे. राज्य सरकारच्या या कॅबिनेट बैठकीत अनिल परब यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे असा प्रस्ताव ठेवला. तसेच उद्याच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घ्यावा असं अनिल परब म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना अटक

… आणि जो बायडेन स्वतः पंतप्रधान मोदींना भेटायला आले

शापूरजी पालनजी उद्योगसमुहाचे प्रमुख पद्मभूषण पालनजी मिस्त्री यांचे निधन

अग्निपथ योजनेला ‘वायू’गतीने अर्ज; ९४ हजार युवक इच्छुक

दरम्यान,काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी औरंगाबादचे नाव हवं तर आता बदलतो. मात्र जिल्ह्यात रस्ते, पाणी, सोयीसुविधा नसतील तर नाव बदलून काय फायदा असा प्रश्न केला होता. मात्र सध्या याचा विचार न करताच सरकार अल्पमतात असल्याने ठाकरे सरकार अँक्शनमोड मध्ये आले आहे.

 

Exit mobile version