23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणपुरवठा कमी? मग महाराष्ट्रात विक्रमी लसीकरण कसे?

पुरवठा कमी? मग महाराष्ट्रात विक्रमी लसीकरण कसे?

Google News Follow

Related

केंद्राकडून सर्वात कमी लशींचा पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे, अशी ओरड करणारे ठाकरे सरकार आता एकाच दिवशी ५ लाख लोकांचे लसीकरण केल्याचा विक्रम केल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. तर लवकरच दीड लाख लशींचा टप्पा पार केल्याचा आनंदही ते साजरा करणार आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र कसा अग्रेसर आहे हे सांगण्याचा हा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राने खरे तर यापेक्षाही उत्तम लसीकरण करावे, सर्व नागरिकांना लस देऊन त्यांना करोनापासून भयमुक्त करावे पण ते करताना दुटप्पी भूमिका मात्र घेऊ नये. जर या विक्रमात राज्यातील ठाकरे सरकारचे कौतुक केले जात असेल तर तेवढ्याच कौतुकास केंद्र सरकारही पात्र आहे. लसीकरणाचा विक्रम झाला की स्वतःलाच शाबासकी द्यायची आणि एरवी लसीकरणासाठी दोन-तीन दिवस पुरेल इतकाच साठाच उपलब्ध आहे, असे रडगाणेही गायचे.

सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी ५ लाखांपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले. हा ठाकरे सरकारच्या मते एक विक्रम आहे. आता महाराष्ट्रातील १ कोटी ४८ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे लवकरच हे लसीकरण दीड कोटींच्या घरात पोहोचेल. त्याचे श्रेय स्वतःला घेताना ठाकरे सरकारचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मग काही दिवसांपूर्वी आम्हाला लस कमी प्रमाणात मिळते आहे, असा कांगावा करणाऱ्यांनी आता या कमी लशींच्या पुरवठ्यातूनही हा विक्रम कसा काय साकारला हे सांगावे.

हेही वाचा:

२ मे ला विजयोत्सवावर बंदी

जबाबदारी ढकलणं ही ठाकरे सरकारची ओळख- रावसाहेब दानवे

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरणार- टास्क फोर्स

कोविड विरूद्धच्या लढाईसाठी सैन्य ‘शस्त्र’ हाती घेणार

मध्यंतरी आम्हाला अवघ्या १७ लाख लशीच मिळतात असा दावा करताना उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या भाजपशासित राज्यांना कसा लसींचा भरघोस पुरवठा केला जातो, असे आरोप केले गेले. प्रसारमाध्यमांनीही केंद्र कसे महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव करते हे दाखवायला सुरुवात केली. पण प्रत्यक्षात जेव्हा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्राला सर्वाधिक १ कोटी ६ लाख इतक्या लशींचा पुरवठा केल्याचे जाहीर केल्यावर ठाकरे सरकारचे तोंड बंद झाले. मग जवळपास एक कोटी लसी पुरवल्यानंतर त्यातून जर दिवसाला लसीकरण करण्याचा विक्रम केला जात असेल तर त्यात केंद्र सरकारलाही काही श्रेय द्यावे लागेल की नाही? पण ते ठाकरे सरकार द्यायला तयार नाही.

परवा रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा केंद्राने दुप्पट केला तेव्हा ठाकरे सरकारच्या पाठपुराव्यामुळे हा साठा मिळाला असे चित्र रंगविण्यात आले. म्हणजे तिथेही केंद्राने काहीही केले नाही, असाच सूर होता.

आता तर महाराष्ट्रात सगळ्यांचे मोफत लसीकरण करणार या घोषणेच्या आधारे पु्न्हा ठाकरे सरकार स्वतःच्या कौतुकात रमले आहे. या लसींचा पुरवठाही करणार आहे ते केंद्र सरकारच. इथेही तोच दुटप्पीपणा दिसून येतो आहे. म्हणजे केंद्राने मदत केली तर त्यांना श्रेय द्यायचे नाही किंवा कसेबसे रडतखडत श्रेय द्यायचे पण जेव्हा आपल्या कामाचा गौरव करायचा असेल तर त्याचे सगळे श्रेय स्वतःच उकळायचे. काही लोकांचा याबद्दल आक्षेप आहे की, आता पुरवठा झाला म्हणून राज्याने एवढे लसीकरण केले. याचा अर्थ केंद्राने हा पुरवठा केला आहे. केंद्राकडून सर्वच राज्यांना पुरवठा केला जाणार आहे. त्यात प्रत्येक राज्याची जी गरज आहे ती एकावेळीच भागविणे शक्य नाही. जसजशी लसनिर्मिती होईल, तसा तो पुरवठा केला जाईल. पण महाराष्ट्राला कमी लशी दिल्या असा दावा करताना मग त्याच कमी लशीत महाराष्ट्रात लसीकरणाचा विक्रम कसा काय झाला ? हा प्रश्न उपस्थित होतोच.

ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून विविध राज्यांतून ऑक्सिजनचे टँकर भरून ते महाराष्ट्रात आणले गेले. त्याबद्दल ठाकरे सरकारच्या वतीने केंद्राचे आभार मानले गेलेत का? तर नाही. कारण त्याची गरज नाही. पण त्याच ऑक्सिजनमुळे लोकांचे जीव वाचले की, श्रेय मात्र स्वतः उपटायचे.  तेव्हा जर केंद्राने केलेला लसींचा पुरवठा कमी आहे असा ठाकरे सरकारचा दावा आहे तर याचा अर्थ एका दिवसांत सर्वाधिक लोकांना लस दिल्याचा राज्याचा दावा खोटाच असला पाहिजे. किंवा मग जर राज्याचा हा दावा खरा असेल तर याचा अर्थ तेवढ्या लसींचा पुरवठाही केला गेला असला पाहिजे. लोकांनाच आता खरे काय आणि खोटे काय हे कळले आहे.

भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून ठाकरे सरकारच्या या दुटप्पीपणावर शरसंधान केले. लसीच्या तुटवड्याबाबत कांगावा केला होता, हे आता तरी ठाकरे सरकारने मान्य करावे, असे भातखळकर यांनी ट्विट केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा