ठाकरे सरकारने निसर्ग चक्रीवादळाची नुकसान भरपाई अजून दिलेली नाही

ठाकरे सरकारने निसर्ग चक्रीवादळाची नुकसान भरपाई अजून दिलेली नाही

गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई सरकारने अजून पर्यंत दिली नसल्याचा धक्कादायक दावा हा कोकणातील कोळी बांधवांनी केला आहे. ठाकरे सरकारने निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी घोषणा खूप केल्या पण त्यांची योग्य रीतीने पूर्तता झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना यासंबंधीची माहिती दिली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बुधवार, १९ मे आणि गुरुवार, २० मे अशा दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांना भेट देणार आहेत. बुधवारी त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात झाली असून, बुधवारी त्यांनी रायगड जिल्ह्यातील चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागाची पाहणी केली. त्या आधी त्यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी चर्चा केली.

हे ही वाचा:

मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा, रासायनिक खतांच्या सबसिडीत १४०% वाढ

मच्छीमारांच्या आक्रोशासमोर पालकमंत्र्यांची बोलती बंद

मुंबई महापालिकेच्या विरोधात भाजपा सदोष वृक्षवधाची याचिका दाखल करणार

मुख्यमंत्र्यांनी निदान मुंबईचा तरी दौरा करावा

काय म्हणाले फडणवीस?
फडणवीस यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चक्रीवादळात जवळपास आठ ते दहा हजार घरांचे नुकसान झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच अजून फायनल असेसमेंट सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. फळ पिकांचे खूप मोठे नुकसान झाले असून जवळपास पाच हजार हेक्‍टर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आत्ता हाती आलेले रेकॉर्ड दोन हजार पर्यंतचे आहेत, पण आकडा पाच हजार हेक्‍टरपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज अधिकाऱ्यांना वाटत असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

तसेच दोनशे शाळांचे नुकसान झाले असून मेडिकल इंफ्रास्ट्रक्चरलाही फटका बसला आहे. मेडिकल इंफ्रास्ट्रक्चरलाच्या एकूण २५ बिल्डिंगचे नुकसान झाले आहे. तर मोठ्या प्रमाणात नुकसान हे वीजेच्या इंफ्रास्ट्रक्चरचे झालेले आहे. अंदाजे सहाशे गावांमध्ये हे नुकसान झाले आहे. याच्या रिस्टोरेशनचे काम सुरू आहे. १७२ गावांमध्ये जवळपास ७० हजार घरे अशी आहेत ज्यांना अजून इलेक्ट्रिसिटीचे कनेक्शन मिळाले नाही किंवा जिथे रेस्टोरेशन झालेले नाहीय. तसेच बोटींचेही खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काय प्रिव्हेंटिव्ह मेजर घेतले याची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाले पाहिजे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचे लवकरात लवकर पंचनामे होणे आवश्यक असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. याच वेळी फडणवीसांनी कोळी बांधवांची व्यथा बोलून दाखवली. निसर्ग चक्रीवादळाला झालेल्या नुकसानाची भरपाई राज्य सरकारने अजूनही दिलेली नाही असे कोळी बांधव सांगत आहेत. त्यात आता हे नुकसान झाले आहे. त्यामुळे या सगळ्याचीच लवकरात लवकर भरपाई द्यावी अशी मागणी कोळी बांधवांनी केली आहे असे फडणवीस म्हणाले.

सरकारने भरघोस मदत करावी
याच वेळी बोलताना सरकारने भरघोस मदत द्यावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. पंचनामे जरी पूर्ण झाले नसले तरीही एकूण परिस्थिती बघता आपल्याला नुकसानाचा अंदाज येऊ शकतो. निसर्ग चक्रीवादळानंतर वर्षभराच्या आतच हे नवीन संकट आलेले आहे. त्यात कोरोनामुळे लोकांचे नोकरी व्यवसाय ठप्प आहेत. निसर्ग चक्रीवादळाचे सरकारने फार काही मोठी मदत केली नव्हती. घोषणा खूप केल्या पण त्याची पूर्तता झाली नाही. त्यावेळी मदत करताना झाडामागे पन्नास रुपये आणि शंभर रुपये अशाच प्रकारची मदत सरकारने केली होती. या वेळेचे नुकसान झालेले क्षेत्र बघता हा तीन चार जिल्ह्यांचा फक्त प्रश्न आहे. त्यामुळे सरकारवर फार आर्थिक बोजाही नाहीये. तेव्हा सरकारने भरघोस मदत करावी अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version