भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. शिवसेनेला सगळ्या गोष्टीत स्वतःच नाव लावायचं असत, राम मंदिराचं श्रेय शिवसेनेला घ्यायचं आहे. बाबरी मशिदीची श्रेय सुद्धा शिवसेनेला घ्यायचं आहे, अशी टीका सोमय्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतःला राम भक्त म्हणतात. हेच ठाकरे जर कोणी हनुमान चालीसा पठणसाठी आले त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करतात. ठाकरे सरकारची जी नौटंकी सुरु आहे ती जनतेला दिसत आहे. ठाकरे सरकारने कितीही नौटंकी केली तरी त्यांचे घोटाळे बाहेर काढणार, असे किरीट सोमय्यांनी सांगितले आहे.
पुढे ते म्हणाले, सत्तेसाठी ठाकरे सरकारने हिंदुत्व गहाण ठेवलं आहे. आदित्य ठाकरे अयोध्याला जाणार आहेत तर एकीकडे उद्धव ठाकरे राजद्रोहाचा कलम लावत आहेत. जे सरकार राम राज्य आणण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचे घोटाळे जनतेला दिसत आहेत. या ठाकरे सरकारमुळे अडीच लाख लोकांचं भवितव्य अडकून पडलं आहे. मात्र ठाकरे सरकारला त्यांच्या वसुलीची भूक लागली आहे.
हे ही वाचा:
कराची बाजारपेठेत स्फोट; तीन ठार
एनआयएच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी अतुलचंद्र कुलकर्णींची नियुक्ती
कराची बाजारपेठेत स्फोट; तीन ठार
रायपूर विमानतळावरील हेलिकॉप्टर अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी जेव्हा किरीट सोमय्यांवर हल्ला झाला तेव्हा पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर कारवाई करण्याचे मागणी करण्यात आली होती. आज पुन्हा किरीट सोमय्यांनी संजय पांडेवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, हल्ल्यावेळी कमांडरमुळे माझे प्राण वाचले, मात्र याच संजय पांडेंनी माझ्या गाडी चालकावर केस केली. जिथे संजय पांडे कार्यरत नाहीत तिथे पोलीस बंदोबस्त चांगला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.