खासदार नवनीत राणा या तुरुंगातून बाहेर आल्यापासून मानेच्या त्रासामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल आहेत. न्यायालयीन कोठडी सुनांवल्यांनंतर राणा भायखळा तुरुंगात होत्या. तिथे त्यांना नीट वागणूक मिळाली नाही असाही त्यांनी आरोप केला होता. दरम्यान, ५ मे रोजी जामीन मिळाल्यांनतर प्रकृती ठीक नसल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनतर भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली. नुकतेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली होती.
शनिवार, ७ मे रोजी देवेंद्र फडणवीस आणि आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांनी नवनीत राणांची भेट घेतली आहे. त्यानंतर जेव्हा फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले. ते म्हणाले, “नवनीत राणा यांची तब्येत स्थिर होत आहे. पण ज्याप्रकारे त्यांना वागणूक देण्यात आली ती अतिशय गंभीर आहे. गुन्हेगारांनीही जी वागणूक दिली जात नाही तशाप्रकारची वागणूक नवनीत राणांना देण्यात आली आहे. या सरकारने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत.” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
पोलीस असल्याचे भासवत महिलेचे दागिने केले लंपास
बीडच्या अविनाश साबळेने मोडला तीस वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम
ठाकरेंच्या आधी पवार पोहोचले अयोध्येला! राष्ट्रवादीलाही लागले हिंदुत्वाचे वेध?
‘ठाकरे सरकार राज ठाकरेंना घाबरले’
नवनीत राणांची प्रकृती ठीक असून त्यांना रविवार, ८ मे रोजी डिस्चार्ज मिळणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याच्या उद्देशाने राणा दाम्पत्य मुंबईत आले होते. त्यांनतर मुंबई पोलिसांनी राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर खासदार नवनीत राणा भायखळा येथील तुरूंगात होत्या. ५ मे रोजी त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली.