आल्या दिवशी केंद्र सरकारकडे बोट दाखवून रडगाणे गाणारे महाराष्ट्रातील ठाकरे सरकार केंद्राने पाठवलेली मदत मात्र राज्यातील गरजूंपर्यंत पोहचवताना दिसत नाहीये. केंद्र सरकारने पाठवलेली ६,४४१ मॅट्रिक टन डाळ ठाकरे सरकारच्या निष्काळजीपणामुळे गरिबांपर्यंत पोहचलीच नाही असा धक्कादायक खुलासा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ही डाळ महाराष्ट्रात सडून वाया जात आहे पण त्याचे वाटप राज्यातील जनतेला ठाकरे सरकारने केले नाही. महत्वाचे म्हणजे ठाकरे सरकारने याबाबतची कबुली दिली आहे.
कोविड परिस्थितीत देशातील गरिबांना अन्न मिळावे यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीसाठी लागू केली होती. तर एप्रिल आणि मे या कालावधीसाठी आत्मनिर्भर भारत योजना लागू करण्यात आली होती. या योजनांच्या अंतर्गत प्रति लाभार्थी ५ किलो अन्नधान्य आणि १ किलो डाळ देण्यात आली.
हे ही वाचा:
चुकांमधून न शिकणारे ठाकरे सरकार कोरोनाबाबतीत पुनश्चः अपयशी
भारतात आज दाखल होणार स्पुतनिक लस
शीतल जोशी-कारूळकर सेन्सॉर बोर्डावर
बंगालची विधानसभा निवडणूक आणि संभाव्य निकाल
याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रासाठी आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत १,७६६ मॅट्रिक टन डाळ तर प्रधानमंत्री प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत १,११,३३७ मॅट्रिक टन डाळ महाराष्ट्राला पाठवण्यात आली. पण राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे यापैकी ६,४४१ मॅट्रिक टन डाळ ही अजूनही शिल्लक राहिली आहे. ६ एप्रिल २०२१ रोजी खुद्द राज्य सरकारनेच ही बाब केंद्राला कळवली. त्यावर केंद्र सरकारने १५ एप्रिल २०२१ रोजी ही डाळ तावरीत वितरित करण्यास राज्य सरकारला सांगितले. ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी १ मे रोजी ही माहिती दिली.
ही बाब राज्य सरकारने ६ एप्रिल २०२१ रोज़ी भारत सरकारला संगितली. त्यावर भारत सरकारने त्वरित कारवाई करत १५ एप्रिल २०२१ रोजी राज्य सरकारला ही डाळ त्वरित लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी सांगितले. (2/4)
— Office of Raosaheb Patil Danve (@raosaheboffice) May 1, 2021
यावर प्रतिक्रीया देताना, “डाळीच्या वितरणाची परवानगी दिली असताना इतकी डाळ शिल्लक राहणे हे राज्य सरकारचा निष्काळजीपणा दर्शवते. वितरण न केल्यामुळे राज्यात ठिकठिकाणी ही डाळ सडून वाया जात असल्याची माहिती समोर येत आहे. या नुकसानीस महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे.” असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.
वितरण न केल्या मुळे आज राज्यात ठिकठिकाणी हि डाळ खराब होण्याची माहिती समोर येत आहे, व या नुकसानीस महा विकास आघाडी सरकार जबाबदार आहे (4/4) : @raosahebdanve
— Office of Raosaheb Patil Danve (@raosaheboffice) May 1, 2021