ठाकरे सरकार एक्सिस बँकेला शरण

ठाकरे सरकार एक्सिस बँकेला शरण

अमृता फडणवीस यांना टोमणे मारणाऱ्या राज्य सरकारचा ‘बाणेदारपणा’ हवेत विरला

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस एक्सिस बॅंकेत असल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्तीवेतन या बँकेत न ठेवता राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवावा, अशा बाता मारणाऱ्या महाविकास आघाडीने कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ज्या १५ बँकांना परवानगी दिली आहे, त्यात एक्सिस बँकेचाही समावेश केला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने तेव्हा बाणेदारपणाचा आणलेला आव आता कुठे गेला, असा सवाल उपस्थित होत आहे.

हे ही वाचा:
कौटुंबिक वादातून महिलेने रेतीबंदर खाडीत मारली उडी

सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा

ठाकरे सरकारमध्ये इतका निबरपणा येतो कुठून?

सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयांना कानपिचक्या

फडणवीस मुख्यमंत्री असताना एक्सिस बँकेला झुकते माप दिल्याचा आरोप ठाकरे सरकार राज्यात अस्तित्वात आल्यावर केला गेला होता. त्यानंतर फडणवीस यांच्या पत्नी अमृता या बँकेच्या सेवेत असल्यामुळे तिथे सरकारने खाती उघडल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला होता. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई आणि ठाणे महापालिकेची एक्सिस बँकेतील खाती अन्य बँकेत वळविण्याचेही पाऊल उचलण्यात आले. पण आता याच बँकेतून पुन्हा एकदा शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार दिले जाणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या त्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. एक्सिस बँकेसोबत फेडरल बँक, येस बँक, कोटक महिंद्र बँक, एसबीएम बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, आरबीएल बँक, आयसीआयसीआय बँक या बँकांचाही सरकारने जाहीर केलेल्या यादीत समावेश आहे. वित्त विभागाने या बँकांची यादी जाहीर केली आहे.

अमृता फडणवीस यांनी एक्सिस बँकेत असलेली शासनाची खाती ही लग्नाच्या आधीपासूनची असल्याचे सांगितले होते. त्यावेळी शिवसेना आणि अमृता फडणवीस यांच्या ट्विटरवर वादही रंगला होता. राष्ट्रीयीकृत बँका असताना खासगी बँकांचे लाड कशाला असा बाणेदारपणाही ठाकरे सरकारकडून दाखविण्यात आला होता. पण शेवटी सरकारला पुन्हा एकदा एक्सिस बँकेला शरण जावे लागले आहे.

यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे की, अमृता फडणवीस यांच्याबाबत वैयक्तिक आकसापायी वावड्या उठवून शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार एक्सिस बँकेत जमा करण्यास मज्जाव करणाऱ्या नासक्या वृत्तीच्या ठाकरे सरकारने सवयीनुसार यूटर्न घेतला आहे. सरकार वैयक्तिक द्वेषावर चालवता येत नाही, याची अक्कल यांना लवकर येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

 

 

Exit mobile version