पत्राचाळीच्या व्यवहारातील मूळ पुरुष आणि ठाकरे कुटुंबाचा आहे जवळचा संबंध!

पत्राचाळीच्या व्यवहारातील मूळ पुरुष आणि ठाकरे कुटुंबाचा आहे जवळचा संबंध!

न्यूज डंका एक्सक्लुझिव्ह

गोरेगाव येथील पत्राचाळीचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. ही पत्राचाळ बिल्डरच्या घशात घालून ६७२ मराठी कुटुंबांना देशोधडीला लावण्यात आले. या मराठी कुटुंबांना काही वजनदार लोकांनी चिरडले. या वजनदार लोकांचा ठाकरे कुटुंबियांशी संबंध असल्याचे समोर येते आहे. ‘न्यूज डंका’ने यासंदर्भात संशोधन करून ही पोलखोल केली आहे.

पत्राचाळ हे मराठी माणूस कसा उद्धवस्त झाला याचे एक उदाहरण आहे. या लुटीत राजकीय नेते, बिल्डर आणि सरकारी अधिकारी यांचा संबंध आहे. याचा मूळ पुरुष कोण आहे? याची यानिमित्ताने चर्चा रंगली आहे.

अलिबागच्या जमिनी आणि फ्लॅट जप्त केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मराठी व मध्यमवर्गीय माणसावर अन्याय केल्याचा सूर लावला पण प्रत्यक्षात गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात मूळ रहिवासी मराठी माणसाला डावलण्यात आले, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप होतो आहे.

पुनर्विकासाच्या नावावर या पत्राचाळीतील मराठी कुटुंबे उद्ध्वस्त झाली. त्या मराठी माणसाचा विचार करण्यात आला नाही, अशी तक्रार पत्राचाळीतील पीडित कुटुंबे करत आहेत. ही इमारत बिल्डरच्या घशात घालण्यात आली. ज्यांच्या डोक्यावर आज छप्पर नाही, अशा ६७२ कुटुंबियांची जबाबदारी बिल्डर व म्हाडाची होती. पण त्यांना भाडेही आज देण्यात येत नाही आणि ही कुटुंबे कशीबशी आपली गुजराण करत आहेत. या मराठी माणसाचे घरकुल टाचेखाली चिरडून तिथे तीन टॉवर उभारण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलचा भाजपा करणार सत्कार! पाच लाखांचा पुरस्कारही जाहीर

पंढरपूरमध्ये पांडुरंगाने आशीर्वाद दिला, कोल्हापूरमध्ये आई अंबाबाई देईल

‘जर भोंगे वाजल्याने राग येत नाही तर हनुमान चालीसा लावल्याने का येतो’

उद्धव ठाकरेंना हिंदुत्व रोज सिद्ध करावं लागतं, बाळासाहेबांवर कधी ही वेळ आली नव्हती

 

हा एकूण घोटाळा १००० कोटींचा असल्याचे दिसते आहे. एचडीआयएलने हा घोटाळा केला. या जागेची मूळ मालकी असलेल्या गुरुआशीष कन्स्ट्रक्शनला टेकओव्हर करून हा घोटाळा झाला. ही कंपनी निपुण ठक्कर, त्यांचा मुलगा मनन ठक्कर, प्रवीण राऊत यांच्या नावाने होती. हे कंपनीत संचालक होते. एचडीआयएलने ही नंतर कंपनी विकत घेतली. नंतर हे सगळे त्यातून बाहेर पडले. हे निपुण ठक्कर मुंबईतील बडे बिल्डर आहेत आणि मुख्य म्हणजे ठाकरे कुटुंबियांचे व्याही आहेत. निपुण यांचा मुलगा मनन ठाकरे यांचा विवाह बिंदूमाधव ठाकरे यांच्या मुलीशी नेहाशी विवाह झाला होता. या लग्नाला स्वतः बाळासाहेब ठाकरे व कुटुंबीय उपस्थित होते. ठक्कर आणि ठाकरे याचे स्नेहबंध तयार झाले. ठक्कर यांनी पत्राचाळीचा विषय हाताळला. हा घोटाळ्याशी निपुण ठक्करचा संबंध आहे. त्याच व्यक्तीकडून एचडीआयएलकडे हा प्रकल्प गेला. या प्रकल्पात बनवेगिरी एचडीआयएलने केले. निपुण ठक्कर गुरुआशीषचा संचालक होता. हाच ठाकरे कुटुंबियांचा व्याही आहे. यावरून वजनदार लोकांचा यात किती आणि कसा सहभाग होता हे लक्षात येते. यांच्या वजनाखाली ६७२ कुटुंबे चिरडली.

प्रवीण राऊत या गुरुआशीष कंपनीत निपुण ठक्करसह बोर्डावर होता. प्रवीण राऊतचे भाई ठाकूरशी संबंध होते. वडराई चांदी प्रकरणात भाई ठाकूर तुरुंगात होता. या प्रवीण राऊतचे संजय राऊत यांच्याशी संबंध आहेत. पत्राचाळ प्रकरण त्यानेच एचडीआयएलकडे नेले. या प्रकरणात जे योजनेचे लाभार्थी व्हायला हवे होते, त्या पत्राचाळीतील कुटुंबियांच्या नावे मात्र दुःख व फरफट आली.

या प्रकरणात ट्राय पार्टी ऍग्रीमेंट झाले. त्यानुसार घर देण्याची जबाबदारी म्हाडाची आहे. पण अजून घर नाही. उद्धव ठाकरे सरकारने प्रकल्पाचे उद्घाटन केले. घरे मिळतील असे आश्वासन दिले. ज्या इमारतीत घरे मिळणार आहे त्याचे काम ४० टक्केच पूर्ण आहे. या संपूर्ण प्रकरणातले मूळ पुरुष हे निपुण ठक्कर आहेत हे स्पष्ट झाले आहे. त्याचा तपास संजय राऊतांकडे वळला आहे. आता हा तपास ठक्कर यांच्यासह ठक्कर कुटुंबीय ज्यांचे व्याही आहेत ठाकरे कुटुंबियांपर्यंत पोहोचणार का याची चर्चा सुरू आहे.

 

Exit mobile version