निवडणुकीत दारुण पराभव दिसू लागल्याने ठाकरेंचं ईव्हीएमवर बोट!

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना सडेतोड उत्तर

निवडणुकीत दारुण पराभव दिसू लागल्याने ठाकरेंचं ईव्हीएमवर बोट!

भाजप ईव्हीएम घोटाळा करून जिंकला तर देशात मोठा असंतोष होईल, असे वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला.उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, याच्यावर आता उत्तर देखील देण्यालायक राहिलेले नाहीये.कारण या लोकांची एक सवय आहे ती म्हणजे, हे जिंकले तर ईव्हीएम चांगली, नाहीतर वाईट.निवडणुकीत पराभव होणार हे दिसू लागल्याने हे लोक ईव्हीएमवर बोलू लागले आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत ठाकरेंवर निशाणा साधला.

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला जनतेचा कौल नाही, त्यामुळे हे सरकार सत्तेवर येणार नाही.जनता या सरकारच्या पाठिशी नाहीये, त्यामुळे हे सरकार ही निवडणूक काही जिंकणार नाही. ईव्हीएमच्या माध्यमातून संभ्रम पसरवला जातोय. जनतेच्या मनाविरुद्ध, ईव्हीएमचा घोटाळा करून भाजप जिंकलं तर देशात मोठा असंतोष निर्माण होईल, असे उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.याच मुद्यावरून आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर सडेतोड उत्तर दिले.

हे ही वाचा:

बहुमतानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ

पश्चिम बंगालमध्ये १६ लाख बनावट मतदार

पदाधिकाऱ्यांना आघाडीच्या बैठकांना जाण्यास आंबेडकरांकडून मनाई; राऊतांकडून सावरासावर

भोजपुरी गायक पवन सिंग यांची निवडणुकीतून माघार!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या लोकांची एक सवय आहे, ती म्हणजे हे जिंकले तर ईव्हीएम चांगली, हे जर हारले तर ईव्हीएम वाईट.आता त्यांना माहित आहे की,त्यांचा दारुण पराभव या निवणुकीमध्ये होणार आहे, त्यामुळे आधीच त्यांनी ईव्हीएमबद्दल बोलायला सुरु केले आहे.माझा, या ठिकाणी या सर्वांना एकच सवाल आहे. देशाच्या इलेक्शन कमिशनला ओपन चॅलेंज दिला आहे. ईव्हीएम टेम्पर करून दाखवा ? आत्तापर्यंत एकही पॉलिटिकल पार्टी असे काही करू शकलेले नाही, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Exit mobile version