शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार यावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच पाणीपुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाचा विचारांचा आहे उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा म्हणजे शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या मिक्स विचारांचा होणार आहे असा जोरदार टोला लगावला आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा होत असलेला हा पहिला दसरा मेळावा आहे त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याची दोन्ही परंपरा आहे दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी जुळणार तयारी सुरू केली आहे, पण दसरा मेळाव्याच्या जागेवरून सध्या उलट सुलट टीका सुरू असून त्यांना गुलाबराव पाटील त्यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
हे ही वाचा:
पत्राचाळ प्रकरणातून मिळालेल्या पैशात संजय राऊत परदेश दौऱ्यावर गेले
“मास्क न वापरलेल्यांकडून कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार दंड वसूल करण्यात आला?”
बायबलच्या ओळी वाचून पंतप्रधान ट्रस यांनी दिला एलिझाबेथना निरोप
अमरिंदर यांच्यासह त्यांचा पक्षही भाजपात विलिन
आमचा दसरा मेळावा बघायला बाळासाहेबांचा आत्मा येईलस असे सांगितले पाटील यांनी कोणताही पार्क किंवा मैदान हे कोणाच्याही मालकीचे नसते ती सार्वजनिक मालमत्ता आहे त्यामुळे पालिका ज्यांना परवानगी देईल त्यांची सभा शिवाजी पार्कवर होईल शिवतीर्थ यांचा आहे त्यांचा आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही असे स्पष्ट शब्दात त्यांनी ठणकावले आहे.
शिवाजी पार्क दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाने अर्ज केला आहे परंतु जर शिवाजी पार्कला सील लावल्यास ते तोडण्याचा इशारा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.