महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या गायब आहेत. ईडीने देखील त्यांना चार वेळा समन्स बजावले होते. मात्र एकाही वेळेला ते ईडीसमोर हजर राहिले नाहीत. अनिल देशमुख यांच्या गायब असण्यावरून विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. भाजपाचे नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्वीटरवरून टीका करताना ठाकरे मंत्रीमंडळात ‘खो खो’चा खेळ चालू सुरू असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की,
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या लपाछपी खेळतायत. दूध का दूध, पानी का पानी… ची गर्जना करणारे गेले काही दिवस गायब आहेत. बहुधा त्यांचं दूध नासलंय. राज्यतले एक मंत्री तुरुंगात जाऊन आले आहेत, देशमुख जाण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे मंत्रिमंडळात ‘खो खो’ चा खेळ सुरू आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या लपाछपी खेळतायत. दूध का दूध, पानी का पानी… ची गर्जना करणारे गेले काही दिवस गायब आहेत. बहुधा त्यांचं दूध नासलंय.
राज्यतले एक मंत्री तुरुंगात जाऊन आले आहेत, देशमुख जाण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे मंत्रिमंडळात 'खो खो' चा खेळ सुरू आहे.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 10, 2021
हे ही वाचा:
आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो?
पुणे मेट्रो विरोधकांना उच्च न्यायालयाचा फटकार
तृणमूलकडून बलात्काराचा राजकीय वापर
अनिल देशमुख यांनी ईडीकडून अटक होऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ३० जुलै रोजी कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी देशमुख यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुखांची ईडीने अटक करु नये ही मागणी देखील मान्य केलेली नाही.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेची शक्यता लक्षात घेता ते ‘मिस्टर इंडिया’ आहेत. ईडीकडून तीनवेळा समन्स पाठवूनही देशमुख चौकशीला हजर झाले नाहीत, शिवाय त्यांच्या कुटुंबातील सदस्यही चौकशीला हजर झाले नाहीत. देशमुख यांनी एक व्हीडिओ जारी करत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर ईडीसमोर येणार असल्याचे म्हटले होते. तरी ते कुठे आहेत हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Atul Bhatkhalkar भारतात असलेल्या आमदाराला अख्खा भारत शोधु शकत नाही. भारत सरकारला लाज वाटली पाहिजे.
काल ईडी तारखेवर त्यांचा वकिल उपस्थित होता. म्हणजे येण्याअगोदर अनिल देशमुख आणि वकिलाची भेट झाली असणार. मग केंद्र सरकार त्या वकिलाला पकडून ग्रिल का करीत नाही? ठावठिकाणा का विचारत नाही?
रेड कॉर्नर अलर्ट जारी केला का?
भारताची कायदा व्यवस्था न मानणारा आमदार? त्याची आमदारकी रद्द करण्यासाठी भाजपा नेत्यांनी पहल केली का? कोर्टात अर्ज केला का?
त्याच्या संपूर्ण संपत्ती वर कुडकी साठी काही भाजपा नेत्यांनी हालचाल केली का?
फुकाचा बोलाचा भात नी बोलाची कढी. तू आमदार मी पण आमदार – अळी मिळी गुप चिळी.
साहेब जबरदस्त अॅक्शन घ्या. बिळातला उंदीर लगेच बाहेर येईल. नुसते खोकलुन काही होत नसते.
सामान्य नागरिकाला जे कळतं ते तुम्हा आमदारांना कळु नये ??
तुमचे उत्तर अपेक्षित आहे.
©️भाई देवघरे