स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे माजी खासदार राहुल गांधी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यावरून वीर सावरकरांवर यापुढे टीका करणार नसल्याचे राहुल गांधी यांनी मान्य केले आहे. यावर आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांनी मान्य करणे हे पुरेसे नाही तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याकडून वीर सावरकरांवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवर माफी वदवून घ्यावी, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. वीर सावरकरांचा वापर राजकीय फायद्यासाठी होत असल्याबद्दल देखील रणजित सावरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सावरकर यांच्या विरोधातील वक्तव्यानंतर राज्यात सगळीकडे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याची दखल ठाकरे गटाला घ्यावी लागली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे विरोधी पक्षांची सोमवारी रात्री एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या टीकेमुळे उद्धव सेना नाराज असून ठाकरे गटाने या बैठकीकडे पाठ फिरवली होती. उद्धव सेनेच्या याच नाराजीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीत मांडला. यासंदर्भात तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना रणजित सावरकर यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना वीर सावरकरांचा अपमान करू नका असा सल्ला देणे पुरेसे नाही. ठाकरे आणि पवार यांनी राहुल गांधीं यांच्याकडून माफी मागवून घ्यावी असे म्हटले आहे.
दोनदा मागितली आता तिसऱ्यांदा माफी मागावी
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल मोठ्या आदराने बोलत आहेत, पण त्यांच्याकडून प्रत्यक्षात कोणतीही कृती होताना दिसत नाही. वीर सावरकरांच्या अपमानाची शिक्षा राहुल गांधींना झाली पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कधी आणि कुठे माफी मागितली हे राहुल गांधी यांनी सांगावे. राहुल गांधी यांनीच सर्वोच्च न्यायालयात दोनदा माफी मागितली होती , आता तिसऱ्यांदाही माफी मागावी असा आग्रहही रणजित पाटील यांनी धरला.
तरच त्यांनी केलेल्या निषेधाचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल
शरद पवारांची बदनामी करणाऱ्या अभिनेत्रीला महिनाभर तुरुंगात टाकले, मग स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांचे काय करणार? असा सवाल करत रणजित सावरकर म्हणाले, सावरकरांना विरोध करणाऱ्यांची साथ उद्धव ठाकरेंनी अजूनही सोडलेली नाही. मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल व्यक्त केलेले विचार स्वागतार्ह आहेत. पण उद्धव ठाकरे यांचे सावरकरांवर खरेच प्रेम असेल तर त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसपासून ताबडतोब वेगळे व्हावे. तरच त्यांनी केलेल्या निषेधाचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल असा टोलाही सावरकर यांनी लगावला आहे.
हे ही वाचा:
नाटू नाटू गाण्याचे प्रसिद्ध संगीतकार एम. एम. किरवाणींना झाला कोरोना
बोरिवलीत राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन
एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक पुन्हा चर्चेत
देशात चर्चा असलेल्या गुंड अतीक अहमदला आज काय शिक्षा होणार? फाशीची मागणी
शिदोरीवर कारवाई का नाही?
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या मुखपत्रावर कारवाई केली नाही. शिदोरीमधील लेखात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अत्यंत खालच्या पातळीवरचे आरोप झाले. हे आरोप करणाऱ्या ‘द वीक’ नावाच्या मासिकातील लेखाचा संदर्भ देत त्या मासिकाने माफी मागितली आहे. तो लेख प्रसिद्ध झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कारवाईसाठी भेटायला गेलो होतो, पण त्यांची भेट झाली नाही, त्यांच्या कार्यालयात दिलेल्या तक्रार पत्रावरही कारवाई झाली नाही.
नाही तर राहुल गांधिजिंचा विरोधात एफआयआर
राहुल यांनी सावरकरांचा अपमान करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही त्यांनी त्यांचा अपमान केला आहे. जर राहुल गांधींनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही तर आम्ही त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करू असेही सावरकर यांनी म्हटले आहे.