गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. या महामारीत आतापर्यंत अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेकांचे संसार या कोरोनाने उद्धवस्त केले आहेत. ही मृतांची आकडेवारी ठेवली जात असून आता या आकडेवारीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रात या आकडेवारीत मोठा घोळ झाल्याचे समोर आले आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्रातील प्रत्येक कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद ठेवल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्रातल्या मृत्यूची नोंद ही सर्वात जास्त पारदर्शी असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत होते मात्र ‘एबीपी माझा’च्या ग्राऊंड रिपोर्टनुसार वास्तव वेगळेच असल्याचे समोर आले आहे.
जानेवारी महिन्यात राज्यात ४3 हजार ९७६, फेब्रुवारी महिन्यात ४६ हजार ९५१ आणि मार्च महिन्यात ५१ हजार ९५२ मृत्यूची नोंद होती. २०१८ पासून या तीन महिन्यांची सरासरी जवळपास अशीच आहे. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात ८४ हजार ३६३, मे महिन्यात १ लाख २२ हजार ८४, जून महिन्यात ८८ हजार ८१२, जुलैमध्ये ६४ हजार ७५९, ॲागस्ट महिन्यात ५९ हजार ८८५ आणि सप्टेंबर महिन्यात ५९ हजार ३६४ मृत्यूची नोंद झाली आहे.
हे ही वाचा:
‘अमित शाह यांनी साखर कारखान्यांना इन्कम टॅक्सच्या जाचातून सोडवले’
‘अमरावतीची घटना पुन्हा घडली तर त्यांना सोडायचे नाही’
अनिल परब, हा तुझ्या बापाचा पैसा आहे का?
विश्व हिंदू परिषद अमेरिकेचे संस्थापक डॉ.महेश मेहता यांचे निधन
या आकडेवारीवरून महाराष्ट्रात जेवढे कोरोनाने मृत्यू झाले आहेत त्या पेक्षा कितीतरी अधिक मृत्यू झाले आहेत, असे चित्र आहे. जानेवारीमध्ये मुंबईत ६ हजार ९५९ मृत्यूची नोंद आहे. एप्रिलमध्ये १३ हजार ७९६, मे मध्ये १२ हजार ८६५ आणि जूनमध्ये १० हजार २५६ मृत्यू झाले आहेत. ज्या ‘मुंबई मॅाडेल’चा गवगवा करण्यात आला त्या मुंबईतही जानेवारी ते संप्टेबर या दरम्यान दुसऱ्या लाटेच्या काळात दुप्पट मृत्यू झालेत.
हे केवळ सरकारकडेच नोंदवले गेलेले मृत्यू आहेत. ‘एबीपी माझा’ने महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाचे सल्लागार आणि तज्ज्ञ सुभाष साळुंखे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, सरकारकडे सुद्धा ज्यांना मृत्युपत्राची गरज आहे अशाच मृत्यूच्या नोंदी होतात. ज्यांच्या नोंदींची गरज नाही असेसुध्दा हजारो मृत्यू असू शकतात ज्याची नोंद झालेली नाही.