कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो ३ च्या पहिल्या मेट्रोची आज, ३० ऑगस्टला चाचणी घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मुंबईची नव्याने लाईफलाईन बनणाऱ्या मेट्रो लाईनची पहिल्या ट्रेनच्या चाचणी यशस्वी झाली आहे. मला वाटतं आता ही मेट्रो धावण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही असे, देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक करताना फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदेंनी पहिलं काम केलं ते म्हणजे मेट्रोच्या सगळ्या अडचणी दूर केल्या. मेट्रोचा हा प्रकल्प पुढच्या वर्षी मार्चपर्यंत पूर्ण झाला असता, पण दुर्दैवाने याबद्दल वादविवाद झाले, स्थगिती आल्या. यामुळे डिसेंबरमध्ये तो प्रकल्प अर्धा धावणार आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला नसता, तर पुढच्या वर्षी अर्धा सोडा, अजून चार वर्ष ट्रेन धावूच शकली नसती. खर्च आणखी वाढला असता आणि याचा भार सामान्य मुंबईकरांवर पडला असता. तिकिटातून तो वसूल झाला असता, अशी टीकाही देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
पुढे फडणवीस म्हणाले, मेट्रोच्या कारडेपोची जो काही वाद झाला, पण जो वाद झाला तो पर्यावरणापेक्षा राजकीय जास्त झाला. मात्र, उच्च न्यायालायने अतिशय योग्य निर्णय देत याला मान्यता दिली. पर्यावरणाचं गणित मांडताना फडणवीस म्हणाले, १७ लाख लोक मेट्रो रोज वापरतील, ७ लाख वाहनं रस्त्यावरून दूर होतील, अडीच लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल. दुर्दैवाने जी झाडं कापावी लागली, त्या झाडांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यात जेवढं कार्बन शोषलं असतं, तेवढ्या कार्बन उत्सर्जनाला ही मेट्रो-३ ८० दिवसांच्या फेऱ्यांमध्ये आळा घालते. त्यामुळे पर्यावरणाला सगळ्यात जास्त मदत कशाची होणार असेल, तर ती मेट्रो-३ची असेल, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणले.
हे ही वाचा:
चित्रदुर्ग मठाच्या पुजाऱ्यावर लैंगिक छळाचे आरोप
वरळी नाक्याच्या बाप्पाचा रथ खेचला मुस्लिम बांधवांनी
निधी देण्यासाठी मिटकरी कमिशन मागतात, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा आरोप
लिंक क्लिक करताच ९७ हजार गमावले
उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मुंबई मेट्रो ३ प्रकल्प जोरदार चर्चेत होता. या मेट्रोचे कारशेड आरेमध्ये सुरु होते मात्र राज्यात महाविकास आघाडी आलाय आणि त्यांनी या प्रकल्पाला स्थगिती दिली. ठाकरे सरकारने कारशेड आरेमधून हलवून कांजूरमार्गला नेली. तिथेही स्थगिती आल्यामुळे हे काम थांबलं होतं. अखेर शिंदे सरकारच्या काळात त्यासंदर्भातल्या सर्व परवानग्या देण्यात आल्या. अखेर आज मेट्रो ३ च्या पहिल्या मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली.