पत्रकार डॅनिअल पर्लची हत्या करणारा दहशतवादी निरपराध! १८ वर्षे विनाकारण तुरुंगात सडवले; सिंध कोर्टाचे धक्कादायक मत…

पत्रकार डॅनिअल पर्लची हत्या  करणारा दहशतवादी निरपराध! १८ वर्षे विनाकारण तुरुंगात सडवले; सिंध कोर्टाचे धक्कादायक मत…

वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार डॅनियल पर्लची हत्या करणा-या अहमद ओमर सईद शेख या दहशतवाद्याची पाकिस्तानच्या सिंध उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवून मुक्तता केली आहे. आयसी ८१४ या भारतीय विमानाच्या अपहरणातही शेखचा समावेश होता.

 

पर्ल हे वॉल स्ट्रीटचे दक्षिण आशियातले प्रमुख होते. ते पाकिस्तानात कार्यरत होते. २००२ साली पर्ल यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या कटाचा मुख्य सूत्रधार दहशतवादी अहमद शेख हा होता. फाहाद नसीम, शेख आदिल आणि सलमान शकील यांचाही या कटात सहभाग होता.

सिंध उच्च न्यायालयात याप्रकरणी खटला सुरू होता. सुनावणीनंतर याप्रकरणी निकाल देताना न्यायालयाने शेख आणि त्याचा साथीदारांवरचे सर्व आरोप रदबादल ठरवले. एवढेच नव्हे तर “कुठलाही गुन्हा न करता या निरपराध तरुणांना १८ वर्ष कोर्टात सडवण्यात आले” असे धक्कादायक मत न्यायालयाने नोंदवले आहे.

 

आश्चर्याची बाब म्हणजे एकूण २३ साक्षीदारांनी या दहशतवाद्यांच्या विरोधात साक्ष दिली होती. अहमद शेखची १९९९ साली IC ८१४ विमान हायजॅक केल्यानंतर भारताने प्रवाशांचे प्राण वाचवण्याच्या मोबदल्यात खतरनाक दहशतवादी मसूद अझहरसोबत सुटका केली होती.

Exit mobile version