‘पुण्यात घडले ते रायगडमध्येही घडेल’! शिवसेना आमदारांचा सोमैय्यांना धमकीवजा इशारा

‘पुण्यात घडले ते रायगडमध्येही घडेल’! शिवसेना आमदारांचा सोमैय्यांना धमकीवजा इशारा

भाजपा नेते किरीट सोमैय्या अलिबाग येथील कोर्लाई गावाच्या दौऱ्यावर आहेत. रश्मी ठाकरे यांच्या नावे असलेले १९ बंगले या गावात आहेत असा दावा सोमैय्या यांनी केला असून त्याची पाहणी करण्यासाठी सोमैय्या निघाले आहेत. पण त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अलिबाग आणि कोर्लाईचे राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.

कोर्लाई गावचे सरपंच प्रशांत मिसाळ आणि रायगड मधील शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी किरीट सोमैय्या यांना धमकीवजा इशारा दिला आहे. सोमैय्या यांना कोर्लाई मध्ये आल्यावर धडा शिकवू असे गावचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी म्हटले आहे. तर पुण्यात जे घडले ते रायगड मध्येही घडेल त्यापेक्षा तीव्र अशाप्रकारे घडेल असा इशारा आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे. सोमैय्या यांनी रायगडमध्ये येऊन शिवसेनेच्या विरोधात काही आरोप केले, तर त्यांना रायगड मधून बाहेर पडू दिले जाणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत पुन्हा सोमय्यांवर घसरले

सुधीर जोशींवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शपथपत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल अब्दुल सत्तार यांची चौकशी

किरीट सोमैय्या कोर्लाई गावाकडे रवाना

पण कितीही धमक्या दिल्या तरी आपण मागे हटणार नाही असा इशारा सोमैय्यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी कधीही या बंगल्यांबाबत इन्कार केला नाही. आम्ही फक्त ग्रामपंचायतीत जाऊन चौकशी करणार आहोत. बंगले होते ही माहिती मला ग्रामपंचायतीतूनच मिळाली. मग आता बंगले चोरिला गेले की गायब झाले? असा सवाल सोमैय्यांनी केला आहे.

त्यामुळे सोमैय्या यांच्या या दौऱ्याने अलिबागमध्ये भाजपा-सेना एकमेकांना भिडणार का? की सोमैय्या यांचा दौरा शांततेत पार पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर सोमैयांच्या दौऱ्यातून नव्या काही गोष्टी समोर येतात का? याकडेही साऱ्यांच्या नजरा आहेत.

Exit mobile version