24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणमुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळात दहा मंत्र्यांनी घेतली शपथ

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळात दहा मंत्र्यांनी घेतली शपथ

Google News Follow

Related

पंजाबची राजधानी चंदीगढमध्ये आपचे नेते आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी आपच्या दहा आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. चंदीगढमध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी सर्व नेत्यांना मंत्री पदाची शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर सर्व मंत्र्यांनी राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेतली. तर पंजाबच्या या नवीन मंत्रिमंडळाची पहिली बैठक दुपारी होणार आहे.

आज आपचे ज्येष्ठ नेते हरपाल सिंह चीमा यांच्यासह बलजीत कौर, विजय सिंघला, लाल सिंह कटरौचक, गुरमीत सिंह मीत हायर, हरभजन सिंह ईतो, कुलदीप सिंह धालीवाल, लालजीत सिंह भुल्लर, ब्रह्म शंकर आणि हरज्योत सिंह बैंस या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान काही दिवसांपूर्वीच भगवंत मान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

पंजाबचे मुख्यमंत्री मान यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या उमेदवारांची यादी ट्विटरवरून प्रसिद्ध केली होती. ही यादी प्रसिद्ध करताना भगवंत मान यांनी पंजाबचे नवे मंत्रिमंडळ असे कॅप्शन देखील या यादीला दिले होते. तसेच या सर्वा उमेदवारांचे मान यांनी अभिनंदन देखील केले होते. दरम्यान काँग्रेसला धोबीपछाड देत आप पंजाबमध्ये सत्तेत आले आहे.

हे ही वाचा:

‘मोदी पंतप्रधान झाले आणि जम्मू-काश्मिरची स्थिती सुधारली’

एमआयएम शिवसेनेला म्हणते, मला बी जत्रंला येऊ द्या की!

“शिवसेनेने ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ यांना स्वीकारले आहे”

योगी आदित्यनाथ या दिवशी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गेल्या आठवड्यात थोर स्वातंत्र्य सेनानी भगत सिंह यांच्या मूळ गावी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यावेळी बोलताना मान यांनी म्हटले होते की, आम आदमी पार्टीचे हे सरकार सदैव नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशिल राहील. पंजाबमध्ये विकासाचे एक नवे व्हिजन घेऊन आप कार्य करेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा