‘जश्न-ए-रिवाज’च्या षड्यंत्राविरुद्ध तेजस्वी सूर्या मैदानात

‘जश्न-ए-रिवाज’च्या षड्यंत्राविरुद्ध तेजस्वी सूर्या मैदानात

भाजपाचे खासदार आणि भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी सोमवारी पारंपरिक कपड्यांचा ब्रँड फॅब इंडियाच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला. फॅब इंडियाने दिवाळीला ‘जश्न-ए-रिवाज’ असे संबोधले होते, त्यावर आक्षेप घेत सूर्या यांनी असे म्हटले की, हा ‘जाणूनबुजून’ केलेला प्रकार आहे.

“दिवाळी, जश्न-ए-रिवाज नाही. पारंपारिक हिंदू पोशाख नसलेल्या मॉडेल्सचे चित्रण करून हिंदू सणांच्या अब्राहमायझेशनचा (इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माशी जडण्याचा) हा प्रयत्न आहे. असे भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्या यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

फॅब इंडियाने ९ ऑक्टोबर रोजी केलेल्या एका ट्विटमध्ये साडी आणि कुर्ता पायजमामध्ये काही पुरुष आणि महिला मॉडेलचे चित्रण केले होते. “जसे आपण प्रेम आणि प्रकाशाच्या सणाचे स्वागत करतो, फॅब इंडियाचा जश्न-ए-रिवाज हा एक संग्रह आहे जो सुंदरपणे भारतीय संस्कृतीला नमन करतो.” असे ट्विटमध्ये म्हटले होते.

फॅबिंडियाने आता त्याचे मूळ ट्विट डिलीट केले आहे.

मणिपाल ग्लोबल एज्युकेशनचे अध्यक्ष मोहनदास पै यांनीही ब्रँडच्या शब्दांच्या निवडीबद्दल टीका केली आहे. “हिंदू सणांसाठी बाहेरील शब्दांचा वापर हा आपला वारसा काढून घेण्याचा आणि तो नष्ट करण्याचा जाणूनबुजून केलेला प्रयत्न आहे! दिवाळीनंतर तुम्हाला हवे असलेले कोणतेही ब्रँड तुम्ही वापरू शकता पण यावेळी हे दिवाळीशी जोडणे ही विकृत मानसिकता दर्शवते!” असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.

हे ही वाचा:

बांग्लादेशात हिंदूंवर हल्ले सुरूच, ६० घरं जाळली

शिवसेना-राष्ट्रवादीची ठाण्यात ‘लसी’ खेच

डेरा सच्चा सौदाच्या गुरमित रामराहीमचा जन्म जाणार तुरुंगात

उदय सामंत, गडाख, अब्दुल सत्तार हे काय १९६६ पासूनचे शिवसैनिक आहेत का?

सूर्या यांच्या ट्वीटचा हवाला देत पै यांनी लिहिले की, “हो अगदी खरे आहे फॅब इंडिया हे जाणूनबुजून करत आहे आणि ग्राहकांनी या गैरवापराचा निषेध केला पाहिजे जसा त्यांनी इतरांसाठी केला आहे.”

Exit mobile version