भाजपा नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे आणि मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढत असतात. आता किरीट सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडी कारवाई झाल्यावर या व्यवहारात मुखमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांचे कसे संबंध आहेत यावर दोन दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी भाष्य केले होते. या प्रकरणात आणखी माहिती सोमय्या यांनी समोर आणली आहे.
कोमो स्टॉक अँड प्रॉपर्टीज प्रा. लि. ही कंपनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परिवाराने स्थापन केली. मुख्यमंत्री यांचे पुत्र आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे या कंपनीत पार्टनर झाले, असा दावा किरीट सोमय्या यांनी करत तेजस ठाकरे यांचे नावही या प्रकरणात समोर आणले आहे. २३ मार्च २०१४ ला ही कंपनी बनवली. नंतर नंदकिशोर चतुर्वेदीची मदत घेतली. ७ कोटी रुपये फक्त कोमो स्टॉक मार्फत ठाकरे परिवाराने मनी लॉन्ड्रिंग केलं आणि ३ सप्टेंबर २०१९ रोजी नंदकिशोर चतुर्वेदीला ठाकरे परिवाराने ही कंपनी विकली.
या कंपनीचे पार्टनर नंदकिशोर चतुर्वेदी यांचा या कंपनीत ५६ टक्के, लुक बॅनेटिक ऑस्ट्रेलियाचा २४ टक्के आणि इतरांचा १० टक्के हिस्सा आहे. म्हणजे ठाकरे परिवार मनी लॉन्ड्रिंग करण्यात ऑस्ट्रेलियनचीही मदत घेत आहेत. हा सर्व घोटाळा मी ईडी, आयकर विभाग आणि कंपनी मंत्रालयाला पाठवला आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
बायज्यूजकडे फिफा फुटबॉल विश्वचषकाचे प्रायोजकत्व
पेनड्राईव्ह बॉम्बवरून राऊतांची आगपाखड
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची होणार सीबीआय चौकशी
‘कोल्हापुरात उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचला होता’
आपण दिल्लीत गेल्यावर इथले घोटाळेबाज सक्रिय होतात. घोटाळेबाज चिंतीत होतात की अब किसका नंबर लगेगा, असे त्यांना वाटत असावे, असा खोचक टोलाही किरीट सोमय्या यांनी लगावला.