महाराष्ट्र सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून रेकॉर्ड केलेले व्हिडीओ देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत समोर आणले. प्रवीण चव्हाण हे गिरीश महाजन यांना बनावट गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस विधिमंडळात यांनी केला आहे. मात्र, वकील प्रवीण चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी पुढे आणलेल्या व्हिडीओमध्ये वाक्यांची मोडतोड करण्यात आली असून सर्व रेकॉर्डिंग समोर येण्याची गरज आहे, असे प्रवीण चव्हाण यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर मूळचा जळगावचा असलेला तेजस मोरे नावाचा तरुण अशील म्हणून आपल्याकडे आला आणि त्याने हे स्टिंग ऑपरेशन केल्याचे प्रवीण चव्हाण म्हणाले.
हे ही वाचा:
वेस्ट इंडीजवर भारतीय महिला संघाचा १५५ धावांनी दणदणीत विजय
तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय म्हणाले जो बायडन?
… म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी पाठवली नोटीस
मिताली राजने विश्वचषक स्पर्धेत रचला हा विक्रम
रेकॉर्डिंग मॅनिप्युलेट करुन वापरण्यात आल्याचे प्रवीण चव्हाण म्हणाले. अशील म्हणून येणाऱ्या तेजस मोरेने भिंतीवर लावायला घड्याळ भेट दिले आणि त्यात छुपा कॅमेरा बसवला, असे प्रवीण चव्हाण म्हणाले. तेजस मोरे हा तुरुंगात होता आणि जामीन मिळवण्यासाठी आपल्याकडे येत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. तेजस मोरे हा मूळचा जळगावचा असून त्याला अनेकांची साथ असल्याचेही चव्हाण म्हणाले. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असे प्रवीण चव्हाण ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हणाले.